July 31, 2024 10:03 AM July 31, 2024 10:03 AM

views 31

देश वेगानं प्रगती करीत असून सरकारचं प्रत्येक क्षेत्रावर लक्ष असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

देशवासियांसाठी राहणीमान सुलभता, कौशल्य विकास आणि रोजगार यावर केंद्र सरकारनं लक्ष्य केंद्रित केल्याचा पुनरूच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. दिल्लीत काल आयोजित केलेल्या विकसित भारताच्या दिशेने प्रवास- केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 नंतरच्या परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना मोदी बोलत होते. देशात रोजगाराला चालना देणाऱ्या सूक्ष्म, लघु, आणि मध्यम उद्योगांकडे विशेष लक्ष देण्याचं आश्वासन देऊन, सरकार नागरिकांना रहाणीमानातली सुलभता आणि गुणवत्तापूर्ण जीवन देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन...