July 5, 2025 8:15 PM July 5, 2025 8:15 PM

views 12

मराठीच्या मुद्द्यावर एकजूट कायम राखण्याचं राज आणि उद्धव ठाकरे यांचं आवाहन

मराठीच्या मुद्द्यावर राज्यातल्या सर्व नागरिकांनी पक्षीय मतभेद दूर करुन एकत्र यावं असं आवाहन राज आणि उद्धव ठाकरे यांनी आज केलं. मुंबईत वरळीत झालेल्या विजयी मेळाव्यात ते बोलत होते. राज ठाकरे यांच्या भाषणानं या मेळाव्याला सुरुवात झाली. राज्यातल्या जनतेला आधी भाषेवरून आणि नंतर जातीपातींमध्ये विभागण्याचा डाव असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे इंग्रजी माध्यमातून शिकले होते, मात्र त्यांच्या मराठीच्या प्रेमावर कुणालाही शंका घ्यायला जागा नव्हती, याकडे त्यांनी लक्ष वेधल...