September 13, 2024 8:18 PM September 13, 2024 8:18 PM

views 9

शिक्षण समाजातल्या असमानतेला दूर करून समानता स्थापित करणारं माध्यम – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

शिक्षण म्हणजे केवळ पदवी नसून समाजातल्या असमानतेला दूर करून समानता स्थापित करणारं माध्यम आहे, असं प्रतिपदान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं. ते आज राजस्थानमधल्या अजमेर इथं केंद्रीय विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात उच्च शिक्षणाची भूमिका महत्वपूर्ण असेल, असंही ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानात रोज नवीन भर घातली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. स्वातंत्र्य संग्रामात बलिदान देणाऱ्या वीरांचं स्मरण ठेवून विद्यार्थ्यांनी आपल्या प्रत्येक कृत...

September 12, 2024 3:11 PM September 12, 2024 3:11 PM

views 8

ठाणे जिल्ह्यात उभारलेल्या संविधान मंदिराचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते लोकार्पण होणार

ठाणे जिल्ह्यात कोपरी इथल्या शासकीय तांत्रिक विद्यालयात उभारलेल्या संविधान मंदिराचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय तसंच राज्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं हे मंदिर उभारण्यात आलं आहे. येत्या रविवारी १५ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता दूरदृश्यप्रणालीद्वारे उपराष्ट्रपती या संविधान मंदिराचं लोकार्पण करणार आहेत.

September 1, 2024 3:38 PM September 1, 2024 3:38 PM

views 7

लष्करी शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय परिवर्तन करणारा आहे – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

लष्करी शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय हा गेम चेंजर अर्थात मोठं परिवर्तन करणारा आहे, असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी या निर्णयाचं वर्णन करताना म्हटलं आहे. लैंगिक समानता आणि लैंगिक न्यायातली महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवणारं हे पाऊल असल्याचं त्यांनी सांगितलं. भविष्यातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि जागतिक कल्याणासाठी योगदान द्यायला छात्रसैनिक तयार आहेत, असं आज उत्तराखंडमधल्या डेहराडून इथं RIMC अर्थात राष्ट्रीय भारतीय लष्करी महाविद्यालयातल्या छात्रसैनिकांना संबोधित करताना, ते म्हणाले.

August 16, 2024 7:54 PM August 16, 2024 7:54 PM

views 16

युवकांनी नागरी सेवांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची गरज – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

युवकांनी नागरी सेवांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची गरज असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज राष्ट्रीय विधी विद्यालयाच्या पदव्युत्तर विभागात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नागरी सेवा परीक्षांचं प्रशिक्षण देणाऱ्या खासगी शिकवणी वर्गांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नये, त्यापेक्षा वेगळ्या वाटा चोखाळण्याचा प्रयत्न करावा असं ते म्हणाले. 

August 13, 2024 1:11 PM August 13, 2024 1:11 PM

views 10

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी घरोघरी तिरंगा बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवला

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नवी दिल्लीतल्या भारत मंडमप इथं घरोघरी तिरंगा बाईक रॅलीला आज सकाळी घरोघरी तिरंगा ही एक चळवळ झाली असून देशातले कोट्यवधी लोक आपल्या घरी तिरंगा ध्वज फडकावत आहेत, असं उपराष्ट्रपती म्हणाले. घरोघरी तिरंगा या मोहिमेतून स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि विकसित भारताबद्दलची देशाची वचनबद्धता दिसते, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, के. राममोहन नायडू, किरेन रिजुजु आणि मनसुख मांडवीय उपस्थित होते

July 11, 2024 7:03 PM July 11, 2024 7:03 PM

views 13

संसदेत आणि विधिमंडळात सर्वपक्षियांनी मैत्रीपूर्ण संवाद ठेवण्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं आवाहन

संसदेत आणि विधीमंडळात सर्व पक्षीयांमध्ये संवादाची गरज आहे. सर्वांनी परस्परांमध्ये मैत्रीपूर्ण आणि सहकार्यात्मक संवाद ठेवावा असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज केलं. ते आज मुंबईत विधानभवनात राज्य विधीमंडळाच्या सदस्यांना संबोधित करत होते. सर्वांनी आत्मपरीक्षण करावं, सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले तरच जनतेच्या समस्या सोडवू शकतात. त्यामुळे लोकांच्या भल्यासाठी काम करा असं आवाहन त्यांनी केलं.   संसद आणि विधीमंडळ ज्या पद्धतीने कामकाज सुरू आहे त्याबद्दल त्यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त क...

July 5, 2024 8:22 PM July 5, 2024 8:22 PM

views 8

उपराष्ट्रपती जगदीप धनखड दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या दोन दिवसांच्या केरळच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या सकाळी तिरुअनंतपुरम इथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या १२ व्या पदवीदान समारंभाला ते उपस्थित राहणार आहेत. सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ते सुवर्णपदकं प्रदान करणार आहेत. या पदवीदान समारंभानंतर उपराष्ट्रपती कोल्लमला रवाना होणार आहेत.