May 29, 2025 9:53 AM May 29, 2025 9:53 AM

views 37

अहिल्यानगरमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना

अहिल्यानगर जिल्ह्यात पावसामुळे मोठं नुकसान झालं असून नुकसानाचे सरसकट पंचनामे अधिकचं मनुष्यबळ उपलब्ध करून तातडीनं करावेत. शासनाच्या स्थायी आदेशाप्रमाणे आपतीग्रस्तांना मदत मिळेलच, परंतू विशेष बाब म्हणूनही मदत आणि पुनर्वसन विभागाकडे मदतीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जलसंपदामंत्री आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. या संकटप्रसंगी सरकार पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली. जिल्हयात पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी विखे पाटील यांनी नगर तालुक्यातील सोनवाडे, ...

May 20, 2025 9:11 AM May 20, 2025 9:11 AM

views 9

अवकाळी पावसामुळे २७ हजार हेक्टर पिकांचं नुकसान

गेल्या काही दिवसात राज्याच्या विविध भागात झालेल्या पावसामुळे राज्यभरात २७ हजार हेक्टर पिकांचं नुकसान झालं आहे. यासंदर्भात लवकरच पंचनामे करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अधिकाऱ्यांना दिले. नाशिकमध्ये आयोजित खरीपपूर्व हंगाम बैठकीनंतर काल त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. खरिप हंगामात खतं कमी पडणार नाहीत याची काळजी घेतली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

May 12, 2025 6:57 PM May 12, 2025 6:57 PM

views 10

राज्यात अवकाळी पाऊस

राज्यात आज विविध ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली. बीड शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे, पाेलिसांसाठी नव्यानं बांधलेल्या इमातीतल्या घरांच्या खिडक्या निखळल्या. जालना शहरासह जिल्ह्यातही हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातही आज दुपारच्या सुमाराला अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.     नाशिक शहराला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपून काढलं. त्यामुळे अनेक भागात पाणी साचलं तर मोठ्या प्रमाणात वृक्ष उन्मळून पडल्यानं वीज पुरवठाही काही काळ खंडीत झाला. अवका...

May 7, 2025 7:19 PM May 7, 2025 7:19 PM

views 18

राज्यात अवकाळी पावसाची हजेरी

धुळे शहर आणि परिसरात आज दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. अचानक आलेल्या वादळाने धुळ्यात काही ठिकाणी झाडे पडली आहे. तर लोकांची तारांबळ उडाली.    भारतीय हवामान विभागाकडून पालघर जिल्ह्यात आज आणि उद्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार डहाणू, वाढवण भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे डहाणू मधल्या अनेक मच्छीमार बोटींचे नुकसान झाले आहे.    नाशिक जिल्ह्यात आज दुपारनंतर जवळपास सर्वच भागात अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अने...

May 5, 2025 7:36 PM May 5, 2025 7:36 PM

views 23

राज्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस

राज्यात आज अनेक ठिकाणी गारपिटीसह अवकाळी पावसानं हजेरी लावली.    जालना शहरासह जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आणि काही भागात गारा पडल्या. त्यामुळे आंबा फळपिकासह कांदा बियाणं, उन्हाळी बाजरी, मका आणि इतर पिकांचं नुकसान झालं. मात्र नागरीकांना उकाड्यातून काहीसा दिलासा मिळाला.    नाशिकमध्ये  मनमाड शहराला  गारपिटीसह अवकाळी पावसानं  झोडपून काढलं.    अहिल्यानगर जिल्ह्यातही आज वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला.   त्यामुळे फळबागांचं आणि काढणीला आलेल्या कांद्याचं  नुकसान झालं.  &n...

April 14, 2025 3:20 PM April 14, 2025 3:20 PM

views 10

राज्यात अवकाळी पावसाचा इशारा

राज्यात अनेक ठिकाणी पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.    कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सिंधुदुर्ग तसंच पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा,सांगली, सोलापूर जिल्ह्यांना आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.    मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिव इथंही पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज असून या जिल्ह्यांना ही यलो अलर्ट जारी केला आहे.   विदर्भातही भंडारा, बुलढाणा, चंद्र...

April 7, 2025 10:41 AM April 7, 2025 10:41 AM

views 12

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे कृषीमंत्र्यांचे आदेश

राज्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकार्यांना दिले असल्याचं, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं. नंदुरबार तालुक्यातल्या नुकसानग्रस्त ठाणेपाडा शिवारात कांदाशेतीची पाहणी केल्यानंतर ते काल बोलत होते. या पावसामुळे राज्यातले २४ जिल्हे आणि १०३ तालुके बाधित झाले असून, पंचनामे करुन आठ दिवसात नुकसानीची आकडेवारी कळेल, असं ते म्हणाले. मदतीबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, तसंच कांदा पिकाबाबत केंद्रीय कृषीम...

April 7, 2025 9:15 AM April 7, 2025 9:15 AM

views 14

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी

मागील दोन दिवसांत बीड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांच्या पिकांचं आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं असून, प्रशासनाने तातडीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांना पत्र लिहिलं.

April 6, 2025 10:48 AM April 6, 2025 10:48 AM

views 18

सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची हजेरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी कणकवलीसह काही भागात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. जोरदार वाऱ्यानं, शहरासह अनेक ठिकाणी झाडं पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली.अवकाळी पावसामुळे आंबा, काजू आणि जांभूळ पिकांचं मात्र नुकसान झालं आहे.

April 3, 2025 8:29 PM April 3, 2025 8:29 PM

views 19

राज्यात अवकाळी पावसाची हजेरी

राज्याच्या अनेक भागात आज अवकाळी पाऊस झाला.   रत्नागिरीत आज पहाटे अनेक ठिकाणी वीजांसह जोरदार पाऊस पडला. पावसामुळे आंबा-काजूसारख्या पिकांसाठी तो नुकसान झालं आहे.   भंडारा जिल्ह्यात आज सकाळपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. तुमसर तालुक्यातल्या पाथरी इथं वीज पडून दोन मजुरांचा मृत्यू झाला.   नागपूर जिल्ह्यात आज सकाळपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे.   अहिल्या नगर जिल्ह्यात बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. अ...