November 26, 2025 12:23 PM November 26, 2025 12:23 PM

views 4

युरेशियन इकॉनॉमिक युनियनसोबतच्या मुक्त व्यापार कराराबाबतच्या चर्चेला सुरुवात

रशियाच्या नेतृत्वातील युरेशियन इकॉनॉमिक युनियनसोबतच्या मुक्त व्यापार कराराबाबतच्या चर्चेला आज औपचारिक सुरुवात होणार आहे. केंद्रिय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी काल ही माहिती दिली. रशियासह अर्मेनिया, बेलारुस, कझाकस्तान आणि किर्गिझस्तान या देशांचा यामध्ये समावेश आहे. गेल्या 20 ऑगस्ट रोजी निश्चित केलेल्या शर्तींच्या अनुषंगानं ही चर्चा केली जाणार आहे. भारतीय उद्योग, शेतकरी आणि मत्स्य व्यावसायिक यांना नवी बाजारपेठ मिळवून देण्याचा या कराराचा उद्देश आहे. भारत इतर काही देशांसोबतच्या व्यापार...

November 13, 2025 8:30 PM November 13, 2025 8:30 PM

views 10

भारत आणि नेपाळ वाहतूक कराराच्या तररतूदीत सुधारणा करणाऱ्या विनिमय पत्राची देवाणघेवाण

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज त्यांचे नेपाळचे समकक्ष मंत्री अनिल कुमार सिंह यांच्याबरोबर नवी दिल्लीत द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत भारत आणि नेपाळ यांच्यातल्या वाहतूक कराराच्या तररतूदीत सुधारणा करणाऱ्या विनिमय पत्राची देवाणघेवाण झाली. या पत्राद्वारे जोगबनी - बिराटनगर दरम्यान थेट रेल्वे सेवा सुरु करून कंटेनर आणि  ठोक मालवाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे कोलकाता आणि विशाखापट्टणम बंदरातून नेपाळपर्यंत मालवाहतूक करणं सुलभ होणार आहे. बैठकीत एकीकृत चेक पोस्ट, इतर पाया...

November 11, 2025 8:07 PM November 11, 2025 8:07 PM

views 16

आरोग्यसेवा परवडणारी करणे हे सरकारचे प्राधान्य- पियुष गोयल

वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की आरोग्यसेवा परवडणारी करणे हे सरकारचे प्राधान्य आहे. नवी दिल्लीतील सीआयआय च्या 22 व्या वार्षिक आरोग्य शिखर परिषदेत ते बोलत होते. त्यांनी आरोग्य आणि जीवनविम्यावरचा जीएसटी 18 टक्क्यांवरून शून्य टक्क्यांवर आणल्याने नागरिकांना दिलासा मिळाल्याचे सांगितले.

October 19, 2025 3:14 PM October 19, 2025 3:14 PM

views 48

मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या पर्यावरणपूरक ई-बग्गी सेवेला प्रारंभ

मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या पर्यावरणपूरक ई- बग्गी सेवेला आज प्रारंभ  झाला. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दूरस्थ पद्धतीने याचं उद्घाटन केलं. या उपक्रमामुळे उद्यानात प्रदूषणमुक्त पर्यटनाचा आनंद मिळेल, आणि पर्यटनाला चालना मिळेल असं गोयल यावेळी म्हणाले. ही ई-बग्गी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य प्रवेशदारापासून कान्हेरी गुंफांपर्यंत धावेल. त्यामुळे प्रवास जलद आणि सुखकर होईल, अशी अपेक्षा आहे.  वनमंत्री गणेश नाईक, यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

October 6, 2025 3:08 PM October 6, 2025 3:08 PM

views 27

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल दोन दिवसांच्या कतार दौऱ्यावर

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून दोन दिवसांच्या कतार दौऱ्यावर रवाना होत आहेत. कतारची राजधानी दोहा इथं गोयल कतारच्या वाणिज्य मंत्र्यांसह कतार भारत संयुक्त आयोग बैठक आयोगाचे अध्यक्षस्थान भूषवणार असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. या भेटीतून भारत - कतार यांच्या दरम्यानच्या व्यापार आणि गुंतवणूक संबंधांचे महत्त्व अधोरेखित होणार असल्याचंही मंत्रालयानं नमूद केलं आहे. कतारमध्ये व्यावसायिक, सनदी लेखापाल संघटना,उद्योग परिषद, उद्योग सदस्य आणि भारतीय समुदायाशी गोयल संवा...

July 19, 2025 8:23 PM July 19, 2025 8:23 PM

views 18

भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटनेबरोबरचा आर्थिक भागिदारी करार १ ऑक्टोबरपासून लागू होणार

भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटनेबरोबरचा व्यापार आणि आर्थिक भागिदारी करार १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे, अशी घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी आज केली. यामुळं देशात १० लाखांहून अधिक रोजगारांची निर्मिती होईल, असं ते म्हणाले.    युरोपियन मुक्त व्यापार संघटनेत आइसलँड, लिंचेस्टाइन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड यांचा समावेश होतो. गेल्या वर्षी १० मार्च रोजी या करारावर स्वाक्षरी झाली होती. यानुसार पहिल्या १० वर्षात हे देश ५० अब्ज डॉलरची आणि पुढच्या ५ वर्षात आणखी ५० अब्ज डॉलरची गुंतवणू...

June 3, 2025 10:37 AM June 3, 2025 10:37 AM

views 13

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर रवाना झाले आहेत. जागतिक व्यापार संघटनेच्या मंत्रीस्तरीय बैठकीला ते आज उपस्थित राहाणार आहेत. पॅरिसमध्ये काल त्यांनी जागतिक स्तरावरील आघाडीच्या उद्योगांच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली. भारतीय बाजारपेठेसाठी इलेक्ट्रीक वाहने आणि अक्षय ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांसाठी गुंतवणूक योजनांविषयी जाणून घेण्याच्या दृष्टीने ही भेट झाली. आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यात गोयल, फ्रान्सचे वित्त आणि उद्योग मंत्री एरिक लोम्बार्ड आणि व्यापार मंत्री लॉरे...

June 1, 2025 3:40 PM June 1, 2025 3:40 PM

views 7

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल फ्रान्स आणि इटली दौऱ्यासाठी रवाना

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आज फ्रान्स आणि इटलीच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. युरोपमधल्या भारताच्या प्रमुख भागीदार देशांसोबतचे धोरणात्मक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करणं, तसंच प्रत्येक परिस्थितीला अनुकूल आणि सर्वसमावेशक जागतिक विकासाच्या परस्पर सामायिक दृष्टीकोनानं पुढे वाटचाल करणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे.  आपल्या फ्रान्स भेटीत पियुष गोयल फ्रान्सचे अर्थमंत्री तसंच व्यापार मंत्र्यांसोबत अनेक द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. याशिवाय ते तिथल्या काही प्रमुख कंपन्यांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांन...

May 2, 2025 1:40 PM May 2, 2025 1:40 PM

views 9

भारत-युरोपीयन संघ मुक्त व्यापार कराराला या वर्षअखेरीपर्यंत मूर्त स्वरुप येईल-पीयूष गोयल

भारत-युरोपीयन संघ मुक्त व्यापार कराराला या वर्षअखेरीपर्यंत मूर्त स्वरुप येईल असा विश्वास वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि युरोपियन संघाचे व्यापार आणि आर्थिक सुरक्षा आयुक्त मारोश सेफकोविच यांनी व्यक्त केला आहे. बेल्जियममध्ये ब्रुसेल्स इथे काल झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत दोन्ही बाजूंनी जागतिक व्यापार आव्हानांचा सामना करण्याविषयी चर्चा झाली.     या बैठकीत व्यावसायिकांसाठी बाजारपेठेत प्रवेश वाढवणं, विश्वासार्ह तसंच वैविध्यपूर्ण पुरवठा साखळ्यांना प्रोत्साहन देणं आणि दोन्ही अर्थव्यवस्थांच...

February 9, 2025 7:00 PM February 9, 2025 7:00 PM

views 16

या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी आणि पर्यटन उद्योगासाठी भरीव तरतूद-पीयुष गोयल

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सातत्य आणि सर्वसमावेशकता असून सुमारे एक कोटी मध्यमवर्गीय कुटुंबं करमुक्त झाली आहेत, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. या करबचतीमधून जनतेच्या हातात  एक लाख कोटी रुपये येतील, हेच पैसे गुंतवणूक आणि व्यवहारात येऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असं ते म्हणाले. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी आणि पर्यटन उद्योगासाठी भरीव तरतूद केल्याचंही  त्यांनी सांगितलं.