April 26, 2025 1:15 PM April 26, 2025 1:15 PM

views 62

उडान योजने अंतर्गत प्रवाशांना परवडणाऱ्या दरात हवाई प्रवास उपलब्ध

उडान योजने अंतर्गत १ कोटी ४९ लाख प्रवाशांना परवडणाऱ्या दरात देशांतर्गत हवाई प्रवास उपलब्ध झाला आहे, असं हवाई वाहतूक मंत्रालयानं प्रसिद्ध केलं आहे.   सध्या देशात ६२५ उडान मार्गांनी ९० विमानतळं जोडली आहेत. २०१४ मध्ये देशात ७४ विमानतळं होती, ही संख्या २०२४ मध्ये दुप्पटीपेक्षा जास्त होऊन १५९ विमानतळं इतकी झाली  आहे.  

December 13, 2024 8:36 PM December 13, 2024 8:36 PM

views 17

विमानतळांवर लवकरच उडाण यात्री कॅफे सुरू होणार

उडाण योजनेअंतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सरकारतर्फे लवकरच विमानतळांवर उडाण यात्री कॅफे सुरू करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री के.आर. राममोहन नायडू यांनी दिली. या कॅफेमध्ये प्रवाशांना परवडणाऱ्या किमतीत अन्न पदार्थांची विक्री करण्यात येईल. कोलकता विमानतळावर प्रायोगिक तत्त्वावर पहिला कॅफे सुरू करण्यात येईल, त्यानंतर देशभरातील अन्य विमानतळांवर सुरू केला जाईल, असंही नायडू यांनी या वेळी सांगितलं. 

July 29, 2024 8:14 PM July 29, 2024 8:14 PM

views 12

उडान योजनेअंतर्गत ८५ विमानतळांना जोडणारे ५७९ मार्ग कार्यरत – राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

उडान योजनेअंतर्गत सध्या १३ हेलिकॉप्टर तळांसह ८५ विमानतळांना जोडणारे ५७९ मार्ग कार्यरत असल्याची माहिती नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्यसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. देशभरात २१ नवे हरित विमानतळ उभारण्याची तत्वतः परवानगी केंद्र सरकारनं दिली असून यापैकी १२ हरित विमानतळ गेल्या १० वर्षांमध्ये कार्यरत झाल्याचंही मोहोळ यांनी सांगितलं.