January 2, 2026 10:15 AM January 2, 2026 10:15 AM

views 3

स्वित्झर्लंडमध्ये बारला लागलेल्या आगीत 40 जणांचा मृत्यू

स्वित्झर्लंडमध्ये, नववर्षाच्या पूर्वसंध्येला वालिस कॅन्टनमधील एका रिसॉर्टमधील ले कॉन्स्टेलेशन मद्यालयामध्ये झालेल्या स्फोट आणि आगी 3च्या घटनेमध्ये चाळीस लोकांचा मृत्यू झाला आणि 115 जण जखमी झाले.   स्थानिक पोलिसांकडून घटनेच्या कारणांचा शोध घेतला जात असून, दहशतवादी हल्ल्याची शक्यता पोलिसांनी फेटाळून लावली आहे. स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पारमेलिन यांनी पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करत आपले नववर्षाचे भाषण पुढे ढकलले आहे.

June 10, 2025 1:41 PM June 10, 2025 1:41 PM

views 8

स्वित्झर्लंड दौऱ्यादरम्यान केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा भारत-ईएफटीए व्यापार करारावर चर्चा

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या स्वित्झर्लंड दौऱ्यात भारत आणि युरोपीयन मुक्त व्यापार संघटनेच्या व्यापार आणि आर्थिक भागीदारी करारावरच्या चर्चेत भाग घेतला. या करारामुळे भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान व्यापार आणि गुंतवणूकीच्या संधी, भागीदारी आणि नव्या शक्यता यावर चर्चा झाल्याचं गोयल यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. आईसलॅंड, लिकटेंस्टीन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड या युरोपीयन मुक्त व्यापार संघातल्या ४ देशांबरोबरचा मुक्त व्यापार करार सप्टेंबरपासून लागू होणार असल्याच...