केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या स्वित्झर्लंड दौऱ्यात भारत आणि युरोपीयन मुक्त व्यापार संघटनेच्या व्यापार आणि आर्थिक भागीदारी करारावरच्या चर्चेत भाग घेतला. या करारामुळे भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान व्यापार आणि गुंतवणूकीच्या संधी, भागीदारी आणि नव्या शक्यता यावर चर्चा झाल्याचं गोयल यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. आईसलॅंड, लिकटेंस्टीन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड या युरोपीयन मुक्त व्यापार संघातल्या ४ देशांबरोबरचा मुक्त व्यापार करार सप्टेंबरपासून लागू होणार असल्याचं गोयल यांनी यापूर्वी सांगितलं होतं.
सर्वात जलद गतीनं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून जग भारताचा केवळ सन्मान करत नाही तर भारताच्या व्यापार सुलभीकरणाच्या दृष्टिकोनाची प्रशंसा करत असल्याचं गोयल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.