July 6, 2025 7:28 PM July 6, 2025 7:28 PM

views 17

नाशिक इथं आयोजित ७ व्या चाईल्ड कप तलवारबाजी स्पर्धेत मुलांच्या सेबर प्रकारात महाराष्ट्राच्या श्रीराज पोळनं पटकावलं सुवर्ण पदक

नाशिक इथं आयोजित ७ व्या चाईल्ड कप तलवारबाजी स्पर्धेत मुलांच्या सेबर प्रकारात महाराष्ट्राच्या श्रीराज पोळ यानं आज सुवर्णपदक पटकावलं. अंतिम लढतीत त्यानं तामिळनाडूच्या ए. एस. जोसेफ याचा ११-८ असा पराभव केला. याच प्रकारात महाराष्ट्रच्याच अरोह जाधव आणि पंजाबच्या हेयांश गर्ग यांना संयुक्तपणे कांस्य पदक मिळालं. आजच्या पदकं प्राप्त केलेल्या खेळाडूंना या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे असलेले आशियाई तलवारबाजी असोसिएशनचे सरचिटणीस राजीव मेहता, आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पदकं आणि प्रमाणपत्रं प्रदान करून सन्मानित कर...

July 14, 2024 3:16 PM July 14, 2024 3:16 PM

views 21

Wimbledon Tennis Championship: नोव्हाक जोकोविच आणि कार्लोस अल्कराज यांच्यात आज चुरशीची लढत

विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष एकेरीत आजचा अंतिम सामना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला नोव्हाक जोकोविच आणि विद्यमान विजेता, स्पेनचा कार्लोस अल्कराज यांच्यात होणार आहे. संध्याकाळी साडेसहा वाजता हा सामना सुरू होईल.   अल्कराजचा हा विम्बल्डनचा दुसरा अंतिम सामना आहे, तर जोकोविचनं सात वेळा या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे. आठवेळा विम्बल्डनच्या जेतेपदावर नाव कोरणाऱ्या रॉजर फेडररच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याचं ध्येय जोकोविचसमोर आज आहे. तर मिश्र दुहेरीत सातव्या मानांकित यान...

July 14, 2024 3:10 PM July 14, 2024 3:10 PM

views 18

३५ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताची १ सुवर्ण आणि ३ रौप्यपदकांची कमाई

कझाकस्तान इथं झालेल्या ३५ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतानं १ सुवर्ण आणि ३ रौप्यपदकं पटकावली आहेत.   मुंबईच्या वेदांत साक्रेनं सुवर्ण, तर रत्नागिरीचा इशान पेडणेकर, चेन्नईचा श्रीजीथ शिवकुमार आणि उत्तर प्रदेशातल्या बरैलीचा यशश्वी कुमार या तिघांनी रौप्यपदकाची कमाई केली.   भारतीय संघाचं नेतृत्व मुंबई टीडीएम प्रयोगशाळेचे प्राध्यापक शशिकुमार मेनन, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या डॉ. मयुरी रेगे, आयआयटी पवईचे डॉ. राजेश पाटकर आणि बडोदा एम. एस. ...

July 1, 2024 5:46 PM July 1, 2024 5:46 PM

views 14

आंतरराष्ट्रीय आणि आशियाई स्तरावर पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत मंत्रिमंडळाचा सर्वसमावेशक धोरण

आंतरराष्ट्रीय आणि आशियाई स्तरावर पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत मंत्रिमंडळाने एक सर्वसमावेशक धोरण ठरवलं असून योग्य प्रक्रिया पूर्ण करून या अधिवेशनात याबाबतचा शासन निर्णय आणला जाईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली. आमदार प्रवीण दटके यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. २०१८ मध्ये आलेल्या दोन शासन निर्णयांद्वारे एकंदर ३३ खेळाडूंना थेट नियुक्ती देण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली. टी-...