May 29, 2025 7:48 PM May 29, 2025 7:48 PM

views 41

सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय जोडी पुरुष दुहेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत दाखल

सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी या जोडीनं आज उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी इंडोनेशियाच्या साबर कार्यमान गुटामा आणि मोह रेझा पेहलवी इस्फहानी या जोडीचा १९-२१, २१-१६, २१-१९ असा पराभव केला.   पुढच्या फेरीत मलेशियाच्या बॅडमिंटनपटूंशी त्यांची गाठ पडेल. उपउपान्त्यपूर्व फेरीत पुरुष एकेरीत एच एस प्रणॉयला तर महिला एकेरीत पी व्ही सिंधूला पराभव पत्करावा लागला.

October 20, 2024 1:34 PM October 20, 2024 1:34 PM

views 16

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आजपासून सात दिवसांच्या सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. सिंगापूरमधल्या दोन दिवसांच्या भेटीत प्रधान भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधणार आहेत. ते उद्या सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉंग आणि उप प्रधानमंत्री गान किम याँग यांची भेट घेणार आहेत. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात धर्मेंद्र प्रधान त्या देशाचे शिक्षणमंत्री जॅसन क्लेअर यांची भेट घेणार आहेत. ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते सहभागी होणार आहेत.

September 22, 2024 6:50 PM September 22, 2024 6:50 PM

views 3

मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते सिंगापूर इथल्या इन्व्हेस्ट इंडियाच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी आज सिंगापूर इथल्या इन्व्हेस्ट इंडियाच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन केलं. हे कार्यालय भारतात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या कंपन्यांसाठी मध्यवर्ती केंद्र म्हणून काम करेल. तसंच विविध क्षेत्रातील सहकार्याला प्रोत्साहन देईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या महिन्याच्या सुरुवातीला केलेल्या सिंगापूर दौऱ्यात या कार्यालयाच्या स्थापनेची घोषणा केली होती. सिंगापूरमध्ये उद्घाटन केलेलं हे इन्व्हेस्ट इंडियाचं परदेशातील पहिलंच कार्यालय आहे.   यावेळी गोयल म्हण...

September 5, 2024 8:52 PM September 5, 2024 8:52 PM

views 14

भारताचे सिंगापूरसोबत ४ सामंजस्य करार

भारत सिंगापूर दरम्यान आज चार महत्त्वाचे करार झाले. आरोग्य आणि वैद्यक, शिक्षण आणि कौशल्यविकास, डिजिटल तंत्रज्ञान, आणि सेमीकंडक्टर भागीदारी या क्षेत्रात सहकार्याविषयीचे हे करार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वाँग यांच्यात शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाल्यानंतर भारताच्या पूर्वेकडे चला धोरणाच्या अनुषंगाने सिंगापूरबरोबर धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत करण्यावर सहमती झाली. त्यानंतर प्रधानमंत्री भारताकडे रवाना झाले. सिंगापूरची भारतात सुमारे १६० अब्ज  डॉलर्सची गुंतवणूक असून...

September 3, 2024 2:51 PM September 3, 2024 2:51 PM

views 18

ब्रुनेई आणि सिंगापूर दौरा आसियान क्षेत्रातल्या भारताच्या भागीदारीला आणखी बळ देईल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी ब्रुनेई आणि सिंगापूर या  देशांच्या तीन दिवसीय  दौऱ्यावर रवाना झाले. हे दोन्ही देश भारताच्या ऍक्ट ईस्ट आणि हिंद-प्रशांत महासागर दुष्टीकोनामधले महत्त्वाचे भागीदार असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. आपला हा दौरा या दोन्ही देशांसह, आसियान क्षेत्रातल्या देशांबरोबरची भारताची भागीदारी आणखी मजबूत करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. भारत आणि ब्रुनेई यांच्यातल्या राजनैतिक संबंधांना ४० वर्ष पूर्ण होत अ...

August 26, 2024 9:12 PM August 26, 2024 9:12 PM

views 5

दुसऱ्या भारत-सिंगापूर गोलमेज परिषदेत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा

दुसरी भारत-सिंगापूर गोलमेज परिषद आज सिंगापूर इथं झाली. भविष्यात दोन्ही देशात सहकार्य वाढवण्याबाबत दोन्ही देशांंच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. डिजिटायझेशन, कौशल्य विकास, शाश्वत विकास, आरोग्य आणि औषधी या क्षेत्रांबद्दल यावेळी चर्चा करण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल या परिषदेला उपस्थित होते.  भारत आणि सिंगापूर यांच्या राजनैतिक संबंधाच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त ...

August 26, 2024 9:27 AM August 26, 2024 9:27 AM

views 18

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल सिंगापूर दौऱ्यावर

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल सध्या सिंगापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल सिंगापूरमध्ये विविध जागतिक व्यावसायिक नेत्यांशी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीच्या मुद्द्यांवर चर्चा केली. याबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका निवेदनात, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे की, भारतातील गुंतवणुकीच्या संधी शोधणं, देशाच्या आर्थिक विकासाचा लाभ मिळवत विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवणं या मुद्यावर या बैठकीत लक्ष केंद्रित करण्यात आलं असून या चर्चांमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगक्षेत्रास...