September 13, 2024 2:46 PM

views 13

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन विकास आराखड्याच्या २५० कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा नियोजन विकास आराखड्याच्या २५० कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी दिली आहे. या निधीतून सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेच्या सर्व १ हजार ३३३ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाऊन मुलांच्या सुरक्षिततेत वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.

September 10, 2024 7:15 PM

views 18

शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी मुर्तीकार जयदीप आपटेच्या पोलीस कोठडीत वाढ

सिंधुदुर्गातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पडल्याप्रकरणी मुर्तीकार जयदीप आपटे याची पोलिस कोठडी न्यायालयानं येत्या शुक्रवारपर्यंत वाढवली आहे. दुसरा आरोपी चेतन पाटील याला न्यायालयानं १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोघांची पोलीस कोठडी आज संपल्यानं दोघांना आज न्यायालयात हजर केलं होतं.

September 3, 2024 7:09 PM

views 8

शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याच्याविरोधात पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. जयदीप याच्यावर पुतळ्याच्या बांधकामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप आहे. पुतळा कोसळल्याच्या दिवसापासून जयदीप फरार आहे. या प्रकरणातला दुसरा आरोपी चेतन पाटील याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

August 31, 2024 9:43 AM

views 28

दोडामार्ग तालुक्यात औषधांचे कारखाने सुरू करण्यात येणार – खासदार नारायण राणे

सिंधुदुर्गातील जंगलातल्या वनौषधींचं सर्वेक्षण करायला सांगितलं असून दोडामार्ग तालुक्यात औषधांचे कारखाने सुरू करण्यात येणार आहेत अशी माहिती खासदार नारायण राणे यांनी दिली. ते काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंच्या प्रदर्शन आणि खरेदी महोत्सवाचं उद्घाटन झालं.

August 12, 2024 4:01 PM

views 23

एटीएम चोरट्याना पोलिसांनी रंगेहाथ पकडले

सिंधुदुर्ग जिल्हयात कुडाळ खरेदी विक्री संघाच्या आवारात एटीएम फोडून रोकड रक्कम चोरताना कुडाळ पोलिसांनी दोन चोरटयांना रंगेहाथ पकडलं. एक चोर एटीएम मध्ये चोरी करतानाच सापडला, तर दुसऱ्याला पणदूर इथं पोलिसांनी पकडलं. एकूण चौघेजण या चोरीत सहभागी होते, पण दोघे पळून गेले. त्यांच्यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे. या प्रकरणी १२ लाख ६५ हजार ९०० रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली असून अटक केलेल्या दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

July 29, 2024 7:30 PM

views 14

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुरत्न योजनेतून ३७,००० लाभार्थ्यांना ४५० कोटी रुपयांहून अधिक रकमेचं वाटप

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटन व्यवसाय वाढवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यात आल्या असून आतापर्यंत चांदा ते बांदा आणि सिंधुरत्न योजनेमधून जिल्ह्यातल्या ३७ हजार लाभार्थ्यांना ४५० कोटी रुपयांहून अधिक रकमेचं वाटप करण्यात आलं आहे. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत झालेल्या बैठकीत दिली. जिल्ह्यामध्ये तब्बल दीडशे नवी हॉटेलं उभारण्यात येणार असून मच्छिमार महिलांच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न सुरू असल्यानं पुढील २ ते ३ महिन्यात जिल्ह्याच्या पर्यटनाला वेगळी गती निर्म...

July 5, 2024 8:24 PM

views 18

सिंधुदुर्गमधील कुडाळ तालु्क्यात पारंपरिक बियाणांची बँक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातल्या नेरूर गावातील  शेतकरी सूर्यकांत कुंभार यांनी पारंपरिक बियाणांची बँक तयार केली आहे.  गेल्यावर्षी पासून सुरू झालेल्या या बँकेत भाताची ३० प्रकारची विविध वाणं, भाजीपाला,फळभाज्या,कडधान्य अशी बियाणे आहेत. या बँकेतून शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतीची एक किलो पारंपरिक बियाणं दिली जातात आणि त्याबदल्यात त्यांच्याकडून दोन किलो बियाणं जमा करून घेतली जातात.