February 18, 2025 7:56 PM February 18, 2025 7:56 PM

views 19

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय पडते यांचा राजीनामा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. कुडाळ इथं आज झालेल्या वार्ताहर परिषदेत पडते यांनी राजीनाम्याची घोषणा केली. पक्षात सध्या सुरू असलेल्या घडामोडी पाहता आपल्याला काम करणं अशक्य असल्याचं पडते यांनी यावेळी सांगितलं. आंगणेवाडीच्या यात्रेनंतर आपण पुढची भूमिका ठरवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

January 8, 2025 7:25 PM January 8, 2025 7:25 PM

views 8

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २७व्या बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सवाला सुरुवात

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ इथं २७ व्या बाबा वर्दम स्मृती नाट्य महोत्सवाला काल रात्री सुरुवात झाली. ज्येष्ठ अभिनेते प्रसाद पंडित यांच्या हस्ते या महोत्सवाचं उदघाटन झालं. नाट्यकर्मी बाबा वर्दम यांच्या जन्मदिनानिमित्तानं दरवर्षी या नाट्यमहोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. सात ते तेरा  जानेवारी दरम्यान होणाऱ्या या नाट्य महोत्सवात राज्यासह गोवा, मध्यप्रदेश आदी राज्यांमधली निवडक सात नाटकं सादर होणार आहेत.

December 29, 2024 7:28 PM December 29, 2024 7:28 PM

views 12

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायतर्फे कणकवलीत ११ वा वारकरी मेळावा आणि संतसेवा पुरस्काराचं वितरण

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायतर्फे आज कणकवलीत ११ वा वारकरी मेळावा आणि संतसेवा पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. ह.भ.प.रमाकांत गायकवाड आणि ह.भ.प. तायाराम गुरव यांना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते संत सेवा पुरस्कारानं गौरवण्यात आलं. मेळाव्याच्या निमित्तानं कणकवली शहरातून हरिनामाच्या गजरात दिंडी काढण्यात आली होती.  

December 12, 2024 3:52 PM December 12, 2024 3:52 PM

views 9

‘अपार’ नोंदणीत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात प्रथम

'एक देश, एक विद्यार्थी ओळख' या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या 'अपार' अर्थात ऑटोमेटेड परमनंट अकॅडमी अकाउंट रजिस्ट्री नोंदणीत सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. अहिल्यानगर दुसऱ्या स्थानावर तर रत्नागिरी तिसऱ्या क्रमांकावर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ लाख ६८ हजार ३४ विद्यार्थ्यांपैकी ८ लाख १९ हजार ९५ विद्यार्थ्यांची 'अपार' नोंदणी पूर्ण झाली आहे. अपारच्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा स्वतंत्र ओळख क्रमांक आणि सोबतच डिजिलॉकरची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे...

December 6, 2024 7:28 PM December 6, 2024 7:28 PM

views 8

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आठ पट्टेरी वाघांची नोंद

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यातल्या जंगलात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या गणनेमध्ये आठ पट्टेरी वाघांची नोंद झाल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.  गेल्या अनेक वर्षांत प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने वाघांची नोंद झाल्यामुळे वनविभागाने वन्यजीव संरक्षणासाठी केलेल्या कामाची पावती मिळाली आहे.    आसपासच्या गावात गुरांवर वाघांनी हल्ले केल्याच्या तक्रारी आल्यामुळे वनविभागाने कॅमेऱ्यांच्या साहाय्याने वाघांचा शोध घेतला तेव्हा ३ नर आणि ५ माद्यांचा वावर असल्या...

December 4, 2024 7:24 PM December 4, 2024 7:24 PM

views 9

सिंधुदुर्गात बेकायदा मद्य वाहतूक प्रकरणी कारवाई

सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाराप इथं बेकायदा मद्य वाहतूक प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं दोघांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून ६१ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे ही कारवाई करण्यात आली.

December 3, 2024 7:36 PM December 3, 2024 7:36 PM

views 6

सिंधुदुर्गात खोल समुद्रातल्या रॉड फिशिंग स्पर्धेचं आयोजन

भारतातल्या पहिली खोल समुद्रातल्या रॉड फिशिंग स्पर्धेचं आयोजन सिंधुदुर्गाच्या भोगवे, निवतीच्या समुद्रात करण्यात आलं होतं. कोकण एक्स्ट्रीम अँगलर्स या संस्थेनं आयोजित केलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रासह, कर्नाटक, गोवा आणि केरळ या राज्यांतून १२ होड्यांमधून ५९ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत कर्नाटकच्या टीम मलबारीज या संघाने साडेबारा किलो वजनाचा गोबरा प्रजातीचा मासा पकडून पहिला क्रमांक पटकावला. तर रत्नागिरीच्या रेड मरीन संघाने दुसरा आणि गोव्याच्या लुअर लिजंड या संघाने तिसरा क्रमांक पटकावला. विजे...

December 2, 2024 6:57 PM December 2, 2024 6:57 PM

views 13

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर सीगल पक्ष्यांचं आगमन

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर सीगल पक्ष्यांचं आगमन झालं आहे. दरवर्षी थंडीचा हंगाम सुरु झाल्यावर युरोपातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून २ ते ३ महिने हे पक्षी मुक्कामी येतात. मालवण दांडी, देवबाग, भोगवे आदी समुद्रकिनारे या पक्षांच्या वावरामुळे गजबजून गेले आहेत. ही पर्यटकांसाठी एक पर्वणी आहे. समुद्रकिनाऱ्यावर मिळणारे मासे, किडे, शिंपल्यातले जीव हे या पक्ष्यांचे खाद्य असून हे पक्षी थव्याने उडत राहून किनारा बदलत राहतात किंवा पाण्यात बसून राहतात.

November 15, 2024 7:33 PM November 15, 2024 7:33 PM

views 20

कणकवली बसस्थानकात दोन एसटी बसमध्ये चिरडल्याने एका महिलेचा मृत्यू

सिंधुदुर्गमध्ये कणकवली बसस्थानकात दोन एसटी बस मध्ये चिरडल्याने एका ३६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळं काहीवेळा नागरिकांनी बस वाहतूक रोखून धरली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी स्वतःकडून मृताच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत दिली. या प्रकरणी दोन्ही बसच्या चालक आणि वाहकांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचं निलंबन केलं जाईल, अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

September 19, 2024 11:40 AM September 19, 2024 11:40 AM

views 14

युनेस्कोचं पथक विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणार

  छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्याच्या अनुषंगानं युनेस्कोचं पथक विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला येत्या ६ आणि ७ ऑक्टोबरला भेट देणार आहे. त्या अनुषंगानं या दोन्ही किल्ल्यांच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केलं आहे.   पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयामार्फत राज्यातल्या मराठा लष्करी स्थापत्य यांना युनेस्को जागतिक वारसा नामांकन मिळण्यासाठी नामांकन प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.