June 4, 2025 10:59 AM June 4, 2025 10:59 AM

views 6

सिक्कीममध्ये लाचेन इथं अनेक ठिकाणी भूस्खलन

सिक्कीममध्ये लाचेन आणि चाटेन इथं अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळं रस्ते संपर्क तुटल्यानं, अडकून पडलेल्या 150 पर्यटकांपैकी 34 जणांची काल सुटका करण्यात आली. उर्वरित पर्यटकांच्या सुटकेसाठी वायु दल आणि आपत्ती निवारण दलानं आज सकाळपासून पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत, मात्र वाईट हवामानामुळं बचाव कार्याला सुरुवात झालेली नाही. वायु दलाला हेलिकॉप्टर उतरवण्यात अडथळे येत आहेत. चाटेन इथं 130 पर्यटक असून ते त्यांच्या हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत.   एनडीआरएफच्या सॅटेलाईट फोनद्वारे त्यांच्याशी संपर्क साधण्यात ये...