June 5, 2025 7:35 PM June 5, 2025 7:35 PM

views 13

सुधाकर बडगुजर यांना शिवसेना पक्षातून काढून टाकल्यानंतर त्यांच्या जागी दत्ता गायकवाड यांची नियुक्ती

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिकमधले उप-नेते सुधाकर बडगुजर यांना पक्षातून काढून टाकल्यानंतर त्यांच्या जागी पक्षाचे सह संपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांची नियुक्ती झाली आहे.   बडगुजर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याच्या कारणावरुन त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं. बडगुजर यांना भाजपात प्रवेश देण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना आज नाशिकमधे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले. 

June 2, 2025 1:10 PM June 2, 2025 1:10 PM

views 13

मंत्री प्रताप सारनाईक यांना बडतर्फ करण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी

मराठी भाषा आणि महाराष्ट्राचा अपमान करण्याबद्दल मंत्री प्रताप सारनाईक यांना बडतर्फ करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली आहे. महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी असून मराठी भाषेसाठी आणि मराठी लोकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षं कायम संघर्ष करत आला असल्याचं सामना या मुखपत्रात म्हटलं आहे. मंत्री प्रताप सारनाईक यांच्या मीरा-भायंदर क्षेत्राची भाषा हिंदी आहे तर आरएसएस नेते भैयाजी जोशी यांच्या घाटकोपरची भाषा गुजराती आहे या वक्तव्यांवरुन ही टीका करण्यात येत आहे. आम्ही मराठी भाषे...

March 4, 2025 7:42 PM March 4, 2025 7:42 PM

views 11

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावर दावा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विधानसभेतल्या विरोधी पक्ष नेते पदावर दावा सांगितला आहे. आमदार भास्कर जाधव यांची नेमणूक करावी असं पत्र पक्षानं आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलं. अर्थसंकल्पापूर्वी भास्कर जाधव यांची विरोधी पक्षनेते पदी नेमणूक होईल, अशी आशा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते पद महाविकास आघाडीतल्या इतर पक्षांसोबत अडीच-अडीच वर्षांसाठी वाटून देण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

January 11, 2025 7:58 PM January 11, 2025 7:58 PM

views 17

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वबळावर लढणार

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  पक्ष स्वबळावर लढणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. नागपुरात ते वार्ताहरांशी बोलत होते. नागपूरपासून मुंबईपर्यंत आपला पक्ष स्वबळावर लढत आहे, कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो, असं राऊत म्हणाले.    खासदार अरविंद सावंत यांनीही राऊत यांच्या म्हणण्याला दुजोरा देत स्वबळावर लढण्याची गरज व्यक्त केली. पक्षाने एकट्याने विधानसभा निवडणूक लढवली असती तर यापेक्षा जास्त आमदार निवडून आले असते असं सावंत म्ह...

October 23, 2024 6:59 PM October 23, 2024 6:59 PM

views 178

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली यादी जाहीर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात केदार दिघे यांना रिंगणात उतरवलं आहे. ठाण्यातून राजन विचारे, दिंडोशीतून सुनील प्रभू, अंधेरी पूर्वमधून ऋतुजा लटके, तर वरळीतून आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात असतील. गुहागरमधून भास्कर जाधव, वांद्रे पूर्वमधून वरूण सरदेसाई, कुडाळमधून वैभव नाईक, तर राजापूरमधून राजन साळवी निवडणूक लढवणार आहेत. नेवासामधून शंकरराव गडाख, बार्शीतून दिलीप सोपल, सावंतवाडीतून ...