मराठी भाषा आणि महाराष्ट्राचा अपमान करण्याबद्दल मंत्री प्रताप सारनाईक यांना बडतर्फ करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली आहे. महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी असून मराठी भाषेसाठी आणि मराठी लोकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षं कायम संघर्ष करत आला असल्याचं सामना या मुखपत्रात म्हटलं आहे. मंत्री प्रताप सारनाईक यांच्या मीरा-भायंदर क्षेत्राची भाषा हिंदी आहे तर आरएसएस नेते भैयाजी जोशी यांच्या घाटकोपरची भाषा गुजराती आहे या वक्तव्यांवरुन ही टीका करण्यात येत आहे. आम्ही मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला असल्याचं विसरू नका असं भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रत्युत्तरदाखल म्हटलं आहे.
Site Admin | June 2, 2025 1:10 PM | Shivsena Uddhav balasaheb thackeray
मंत्री प्रताप सारनाईक यांना बडतर्फ करण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी
