August 11, 2025 6:38 PM August 11, 2025 6:38 PM
10
राज्यातल्या जनतेला जुलूमशाही विरोधात रस्त्यावर उतरावं लागेल – उद्धव ठाकरे
महाराष्ट्र हा आजपर्यंत नेहमी देशाला दिशा दाखवत आला आहे. राज्यातल्या जनतेला जुलूमशाही विरोधात रस्त्यावर उतरावं लागेल, असं आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. महायुती सरकारमधल्या कथित भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज मुंबईसह राज्यभरात आंदोलन केलं. त्यानिमित्त मुंबईत उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांना संबोधित केलं. महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्यावर त्यांनी टीकास्त्र सोडलं. भ्रष्टाचाऱ्यांना दूर करुन मंत्रिमंडळात घ्यायला दुसरे...