डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मनसेच्या प्रस्तावाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रतिसाद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर जाण्याच्या प्रस्तावाला आपल्या पक्षाचा सकारात्मक प्रतिसाद असून भविष्यातही राहील असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. नाशिक इथं आज ते वार्ताहरांशी बोलत होते. राज ठाकरे यांच्याबरोबर जाण्यासाठी महाराष्ट्रद्रोह करणाऱ्यांशी संबंध ठेवू नये एवढीच अट राहील असं सांगून ते म्हणाले, की राज ठाकरे यांच्यासाठी आपल्या पक्षाचे दरवाजे उघडे आहेत.

 

राज्यातल्या महानगरपालिका प्रशासकांच्या ताब्यात असल्याने स्थानिकांचे प्रश्न कायम आहेत, त्यामुळे लौकरात लौकर महानगरपालिका निवडणुका घेतल्या पाहिजेत असं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा