December 26, 2025 5:26 PM December 26, 2025 5:26 PM

views 623

मनसेला धक्का! प्रकाश महाजन यांचा शिवसेनेत प्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडलेले प्रकाश महाजन यांनी आज ठाण्यातत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आपण पद किंवा उमेदवारीसाठी कोणतीही मागणी न करता शिवसेनेत प्रवेश केला असल्याचं महाजन यांनी बातमीदाराशी बोलताना सांगितलं. ते शिवसेनेचे प्रवक्ते असतील, असं शिंदे यांनी सांगितलं.

November 29, 2025 6:56 PM November 29, 2025 6:56 PM

views 61

निलेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

सिंधुदुर्ग पोलिसांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांच्यासह ३-४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भाजपाचे पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरी केलेल्या घुसखोरी प्रकरणी केनवडेकर यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झाला. यामागे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा हात असल्याचा आरोप राणे यांनी केला आहे. गुन्हा उघड करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. गुन्हा करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही, असंही ते म्हणाले.

November 12, 2025 3:26 PM November 12, 2025 3:26 PM

views 266

शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबतच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

शिवसेना पक्षाचं नाव आणि अधिकृत निवडणूक चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आव्हान दिलं आहे. या संदर्भातली सुनावणी येत्या २ डिसेंबरला होणार होती. मात्र, राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही सुनावणी वेळेआधी घ्यावी, अशी विनंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली होती.    त्यामुळे आ...

November 8, 2025 5:57 PM November 8, 2025 5:57 PM

views 17

‘सिंधुदुर्गात निवडणूक महायुती म्हणून लढण्यासाठी शिवसेना सकारात्मक’

सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक महायुती म्हणून लढण्यासाठी शिवसेना सकारात्मक आहे, मात्र युती झाली नाही तर शिवसेना स्वबळावर लढण्यासाठी तयार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. ते आज सिंधुर्ग इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सिंधुदुर्गात नारायण राणे हे महायुतीचे नेते आहेत, त्यांच्या भूमिकेशी आपण सहमत आहोत असं सामंत म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यात महायुती म्हणून निवडणूक लढणार असल्याचं निश्चित झालं आहे, असंही सामंत यांनी सांगितलं. 

October 8, 2025 3:01 PM October 8, 2025 3:01 PM

views 291

शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हासंदर्भातली १२ नोव्हेंबरला सुनावणी

शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर आता येत्या १२ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीपर्यंत होणार असून त्यापूर्वी या प्रकरणाची सुनावणी घ्यावी, अशी विनंती ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ठाकरे यांच्या वतीनं केली. ही विनंती मान्य करून येत्या १२ नोव्हेंबर रोजी सुनावणी घेण्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.     शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्...

July 16, 2025 3:10 PM July 16, 2025 3:10 PM

views 34

शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती जाहीर

शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती झाल्याची घोषणा शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी आज केली.   मुंबई इथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा करण्यात आली. गेल्या अडीच वर्षांत सामान्य माणसासाठी तसंच गोरगरीब, शोषित आणि वंचितांसाठी आपल्या सरकारने विविध योजना सुरू केल्याचं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. आपल्या सरकारने केलेलं काम पटल्यामुळेच रिपब्लिक सेना आपल्याबरोबर असल्याचंही शिंदे यावेळी म्हणाले.    दोन्ही पक्षांची युती ...

July 14, 2025 3:13 PM July 14, 2025 3:13 PM

views 42

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुरूअसलेली सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. ऑगस्ट महिन्यात अंतिम सुनावणीला सुरुवात करू, असं सांगत न्यायालयानं आज सुनावणी पुढं ढकलली. न्यायालयात आज, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.   यावेळी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्यांनी ठाकरे गटाला सांगितलं की, आता या प्रकरणाला दोन वर्षे झाली आहेत. तुम्ही त्यामुळे आता नव्यानं अर्ज करणं बंद करा. हे प्रकरण दोन वर्षांपास...

July 5, 2025 8:14 PM July 5, 2025 8:14 PM

views 24

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात मराठी ऐवजी सत्तेची लालसा दिसून आल्याची भाजपा आणि शिवसेनेची टीका

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात मराठी भाषेच्या आडून द्वेष आणि आगपाखड दिसून आल्याची टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. महाराष्ट्र गीताला राज्यगीताचा दर्जा आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही महायुती सरकारनेच मिळवून दिल्याची आठवणही शिंदे यांनी यावेळी करून दिली.  

June 6, 2025 5:48 PM June 6, 2025 5:48 PM

views 34

माजी मंत्री आणि काँग्रेसचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधु शंकर म्हेत्रे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश

माजी मंत्री आणि काँग्रेसचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधु शंकर म्हेत्रे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट इथं काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यात हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी मंत्री दादा भुसे, मंत्री संजय राठोड, विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे उपस्थित होत्या. विरोधकांनी कितीही टीका केली तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला.  

June 4, 2025 7:42 PM June 4, 2025 7:42 PM

views 6

सुधाकर बडगुजर यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा होत्या.   पक्षामध्ये संघटनात्मक बदल करताना आपल्याला विश्वासात घेतलं नसल्यामुळे नाराज असल्याचं बडगुजर यांनी काल सांगितलं होतं. त्यामुळे पक्षाची भूमिका जाहीर करण्यासाठी जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी आज सकाळी नाशिकमधे पत्रकार परिषद घेऊन बडगुजर यांची हकालपट्टी केल्याचं जाहीर केलं.