माजी मंत्री आणि काँग्रेसचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधु शंकर म्हेत्रे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट इथं काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यात हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी मंत्री दादा भुसे, मंत्री संजय राठोड, विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे उपस्थित होत्या. विरोधकांनी कितीही टीका केली तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला.