January 2, 2025 7:35 PM January 2, 2025 7:35 PM
17
संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची सरकारची तयारी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यास सरकार अनुकूल आहे. यासंदर्भात निकम यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे. याशिवाय या प्रकरणातल्या आरोपींना बीडच्या पोलिस कोठडीतून इतरत्र हलवण्याची मागणीही केल्याचं धस यांनी सांगितलं. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, हा खटलाच बीड जिल्ह्याऐवजी दुसऱ्या ठिकाण...