December 12, 2025 1:42 PM December 12, 2025 1:42 PM

views 23

संसदेच्या दोन्ही सभागृहात संसदेवर झालेल्या हल्ल्यातल्या शहीदांना आदरांजली

लोकसभेत आज कार्तिगाई या दीपप्रज्वलनाच्या प्रथेवरून द्रमुक पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत कामकाज तहकूब झालं. आज सकाळी कामकाज सुरु झाल्यावर सदनाच्या सदस्यांनी माजी लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील यांना आदरांजली वाहिली.   लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाला शिवराज पाटील यांच्या निधनाची माहिती दिली. शिवराज पाटील यांनी महाराष्ट्राच्या लातूर संसदीय मतदारसंघातून सलग सात वेळा सभागृहाचे सदस्य म्हणून काम केलं. त्यांच्या कार्यकाळात उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारांची सुरुवात झा...

August 11, 2025 1:31 PM August 11, 2025 1:31 PM

views 6

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी विविध कारणांवरून गदारोळ केल्यामुळे आज दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. सकाळी अकरा वाजता राज्यसभेचं कामकाज  सुरु होताच उपाध्यक्ष हरिवंश यांनी शून्य प्रहर  पुकारण्याचा प्रयत्न केला, परंतु विरोधकांनी बिहारमधल्या मतदारयाद्या पुनरिक्षणासह इतर मुद्दे मांडण्यास सुरुवात केली.   विविध पक्षांकडून पाच मुद्द्यांवर   २९ स्थगन प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती उपाध्यक्षांनी दिली. यापैकी १८ प्रस्ताव न्यायप्रविष्ट असल्यानं त्यावर ...

July 31, 2025 3:00 PM July 31, 2025 3:00 PM

views 5

आज संसदेच्या दोन्ही सभागृहात इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं निसार या कृत्रिम अपर्चर रडार उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल आज संसदेच्या दोन्ही सभागृहात इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन करण्यात आलं. या उपग्रहाचं काल श्रीहरिकोटा इथल्या अवकाश केंद्रावरुन यशस्वी प्रक्षेपण झालं. इस्रो आणि नासाच्या सहकार्यातून यशस्वी झालेला हा प्रकल्प भारताची अंतराळ क्षेत्रातली वाढती क्षमता अधोरेखित करतो असं उपाध्यक्ष हरिवंश म्हणाले.    लोकसभेत सभापती ओम बिरला यांनी इसरोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन करुन त्यांना भविष्यातल्या कामगिरीसाठ...

July 26, 2025 1:43 PM July 26, 2025 1:43 PM

views 7

संसदेत येत्या सोमवारी ऑपरेशन सिंदूरविषयी चर्चा

संसदेत येत्या सोमवारी ऑपरेशन सिंदूरविषयी चर्चा होणार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांना काल माध्यमांशी बोलताना दिली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय कामकाज समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले.   संसदेच्या दोन्ही सभागृहात यावर चर्चा होणार असून त्यासाठी १६ तास देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.  न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव एकमताने मांडला जावा यावर बैठकीत एकमत झाल्याचं रिजिजू यांनी सांगितलं...

July 16, 2025 1:42 PM July 16, 2025 1:42 PM

views 18

संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २१ जुलैपासून सुरु होणार

संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी रविवारी केंद्रसरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत, संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्व पक्षांकडून सहकार्याचं आवाहन सरकार करेल.   संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी,  २१ जुलैपासून सुरु होणार असून  ते येत्या २१ ऑगस्टपर्यंत चालेल. अधिवेशनादरम्यान अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होऊन ती मंजूर होण्याची शक्यता आहे.

June 4, 2025 8:03 PM June 4, 2025 8:03 PM

views 12

संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २१ जुलैपासून सुरु होणार

संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २१ जुलैपासून सुरु होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज समितीची बैठक अध्यक्ष राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झाली. त्यानंतर संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली. हे अधिवेशन येत्या १२ ऑगस्टपर्यंत चालेल. त्यात सर्व विषयांवर चर्चा शक्य आहे असं ते म्हणाले.   ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन घेण्याची मागणी काही काळ विरोधी पक्षांकडून होत होती. मात्र आता नियमित पावसाळी अधिवेशनाच्या तारखा ...

April 4, 2025 1:26 PM April 4, 2025 1:26 PM

views 9

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज संस्थगित

संसदेच्या दोन्ही सभागृहाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज आज संस्थगित झालं. ३१ जानेवारी रोजी सुरू झालेल्या या अधिवेशनात ११८ टक्के काम झालं असून १६ विधेयकं पारित  झाल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात सांगितलं.    वक्फ सुधारणा विधेयकावर लोकसभेत १४ तास तर  राज्यसभेत १७ तास चर्चा झाल्याचं संसदीय कार्य मंत्री किरेन रिजीजू यांनी सांगितलं.  हे विधेयक सरकारने बळजबरीने पारीत करून घेतल्याचा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी  यांचा आरोप रिजिजू यांनी फेटाळून लावला. ...

February 14, 2025 10:25 AM February 14, 2025 10:25 AM

views 7

संसदेची दोन्ही सभागृह येत्या 10 मार्चपर्यंत स्थगित

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा काल संपला; त्यामुळे संसदेची दोन्ही सभागृह येत्या 10 मार्चपर्यंत संस्थगित करण्यात आली आहेत. गेल्या महिन्यात 31 जानेवारी रोजी अधिवेशनाचा पहिला टप्पा सुरू झाला होता. अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात 112 टक्के कामकाज झाल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं. तत्पूर्वी वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 बाबतच्या संयुक्त समितीचा अहवाल काल संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांच्या गदारोळात सादर करण्यात आला.   केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी का...

February 10, 2025 1:46 PM February 10, 2025 1:46 PM

views 12

संसदेतल्या कामकाजाबाबत सभापतींची चिंता व्यक्त

संसदेत आणि राज्य विधिमंडळांमध्ये नियोजित पद्धतीनं व्यत्यय आणणं तसंच सदस्यांचा कामकाजातला कमी होत चाललेला सहभाग याबद्दल लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी चिंता व्यक्त केली. १५ व्या महाराष्ट्र विधिमंडळातल्या नवनिर्वाचित सदस्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते आज दिल्लीत बोलत होते.   कामकाजात जाणूनबुजून आणला जाणारा व्यत्यय संसदीय लोकशाहीसाठी घातक असल्याचं त्यांनी सांगितलं. विविध संसदीय समित्यांच्या कामकाजाबद्दल तसंच संसदीय भाषेत आपला मुद्दा मांडण्याबाबत त्यांनी सदस्यांना माहिती दिली.

August 9, 2024 8:07 PM August 9, 2024 8:07 PM

views 17

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज संस्थगित

संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज आज निर्धारित वेळेआधी दोन दिवस संस्थगित करण्यात आलं. गेल्या महिन्यात २२ तारखेला सुरु झालेलं संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपर्यंत चालणार होतं. लोकसभेत या अधिवेशन काळात १५ बैठका झाल्या, ११५ तास कामकाज झालं, अशी माहिती सभापती ओम बिर्ला यांनी दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ जुलैला सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर २७ तास १९ मिनिटं चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. या अधिवेशन काळात लोकसभेत नवीन १२ विधेयकं मांडण्यात आली, त्यापैकी वित्त विधेयक, विनियोजन ...