संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २१ जुलैपासून सुरु होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज समितीची बैठक अध्यक्ष राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झाली. त्यानंतर संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली. हे अधिवेशन येत्या १२ ऑगस्टपर्यंत चालेल. त्यात सर्व विषयांवर चर्चा शक्य आहे असं ते म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन घेण्याची मागणी काही काळ विरोधी पक्षांकडून होत होती. मात्र आता नियमित पावसाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर झाल्या असल्यानं विशेष अधिवेशनाची शक्यता मावळली आहे.