May 9, 2025 7:38 PM May 9, 2025 7:38 PM

views 6

शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांच्यावर आज देगलूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

  नांदेड जिल्ह्यातल्या शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांच्यावर आज देगलूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ६ मे  रोजी श्रीनगरच्या तंगधार इथं जात असताना सैन्य दलाचं वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या  अपघातात त्यांना वीरमरण आलं. २०१७ मध्ये ते भारतीय सैन्य दलात भरती झाले होते.