December 17, 2024 6:55 PM

views 14

रशियाच्या अणुसंरक्षण दलाचे प्रमुख इगोर किरिलोव्ह यांचा स्फोटात मृत्यू

रशियाची राजधानी मॉस्को इथे आज एका इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लपवून ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाल्याने रशियाच्या अणुसंरक्षण दलाचे प्रमुख इगोर किरिलोव्ह यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासह त्यांच्या सहाय्यकाचाही यात मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना क्रेमलिनच्या आग्नेय दिशेला असलेल्या एका रस्त्यावर घडली. किरिलोव्ह यांनी एप्रिल २०१७मध्ये दलाचं नेतृत्व स्वीकारलं होतं. या हल्ल्याची जबाबदारी यूक्रेनच्या सुरक्षा दलांनी स्वीकारली आहे.     

December 10, 2024 9:48 AM

views 20

सिरियामधून आश्रय घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचे अर्ज युरोपीय राष्ट्रांकडून प्रलंबित

सिरियामधून आश्रय घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचे अर्ज युरोपीय राष्ट्रांनी प्रलंबित ठेवले आहेत. सिरियात बंडखोरांनी देशाचा ताबा घेतल्यानंतर अध्यक्ष बशर-अल-असाद यांनी पलायन केलं; त्यानंतर युरोपीय राष्ट्रांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सिरियामधल्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि तिथली राजकीय स्थिती स्पष्ट होईपर्यंत कोणताही निर्णय घेणार नसल्याचं जर्मनी आणि ब्रिटनकडून सांगण्यात आलं आहे. जर्मनीनं या वर्षी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सिरियातून आश्रय मागणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असून जर्मनीकडे आश्रय म...

December 8, 2024 8:34 PM

views 20

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशियाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज रशियाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. आपल्या रशिया भेटीत राजनाथ सिंह येत्या मंगळवारी मॉस्को इथं भारत-रशिया आंतर सरकारी लष्करी तसंच लष्करी तंत्रज्ञानविषयक सहकार्य आयोगाच्या २१ व्या बैठकीत सहभागी होतील. राजनाथ सिंह यांच्यासह रशियाचे संरक्षणमंत्री आंद्रे बेलूसोव्ह हे या बैठकीचं सहअध्यक्ष भुषवणार आहे.   या बैठकीत दोन्ही नेते संरक्षण क्षेत्रातील परस्पर संबंधांचा आढावा घेतील, यासोबतच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करतील...

November 27, 2024 9:49 AM

views 23

रशिया हा भारताचा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा पुरवठादार

रशिया हा भारताचा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा पुरवठादार झाला आहे. देशाच्या कच्च्या तेलाच्या आयातीमधला ३५ टक्क्यांहून अधिक वाटा रशियाचा असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल दिली. नवी दिल्लीत काल फिपी तेल आणि वायू पुरस्कार सोहळ्यात पुरी बोलत होते. गेल्या दोन वर्षात देशाच्या तेलाच्या स्रोतांमध्ये झालेल्या बदलावर प्रकाश टाकत, फेब्रुवारी २०२२ पासून रशियाकडून होणाऱ्या आयातीत सातत्यपूर्ण वाढ झाली असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

November 19, 2024 2:51 PM

views 17

सुदानमध्ये तात्काळ युद्धविराम करण्याच्या ठरावावर रशियाचा नकार

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सुदानमध्ये तात्काळ युद्धविराम करण्याच्या ठरावावर रशियानं व्हेटो अर्थात नकाराधिकार वापरला आहे. या परिषदेतील १५ सदस्य राष्ट्रांपैकी या निर्णयाविरोधात व्हेटो वापरणारा रशिया हा एकमेव देश आहे.

November 15, 2024 8:15 PM

views 13

रशियानं युक्रेनवर केलेल्या हवाई हल्ल्यात १ ठार, ८ जखमी

रशियानं युक्रेनवर केलेल्या हवाई हल्ल्यात एक जण ठार झाला आणि इतर आठ जण जखमी झाले. रशियाची २१ ड्रोन्स पाडल्याचं युक्रेनच्या लष्करानं म्हटलं आहे. तर युक्रेनच्या वोझनेसेंका गावावर ताबा मिळवल्याचं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं आहे.

November 11, 2024 8:29 PM

views 13

डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा झाल्याचं वृत्त रशियानं फेटाळलं

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा झाल्याचं वृत्त रशियानं फेटाळलं आहे. ट्रम्प निवडणुुकीत विजयी झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये दूरध्वनीद्वारे चर्चा झाल्याचं वृत्त खोटं आणि काल्पनिक असल्याचं रशियाच्या अध्यक्षांचे प्रवक्ते देमित्री पेस्कोव्ह यांनी आज मॉस्कोमध्ये वार्ताहरांना सांगितलं. 

November 10, 2024 8:02 PM

views 30

रशिया आणि युक्रेनकडून परस्परांवर ड्रोनचा बेछूट मारा

रशिया आणि युक्रेन यांनी काल रात्रभर परस्परांवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले केले. काल रात्री रशियानं एकूण १४५ ड्रोन्स सोडले. एकाच रात्रीतला हा सर्वात मोठा ड्रोनचा मारा होता. आज सकाळी युक्रेननं मॉस्कोवर ३४ ड्रोन्सचा मारा केला. २०२२ मधे हा संघर्ष सुरु झाल्यापासून रशियावर राजधानीवर झालेला हा सर्वात मोठा ड्रोनहल्ला आहे. या हल्ल्यामुळे मॉस्कोमधल्या तीन प्रमुख विमानतळांवरची वाहतूक इतरत्र वळवावी लागली. आता वाहतूक सुरळीत असल्याचं रशियाच्या हवाई वाहतूक निरीक्षक संस्थेनं म्हटलं आहे. या ड्रोन हल्ल्यात एकजण ...

October 21, 2024 4:53 PM

views 14

रशियातल्या कझान इथला भारतीय समुदाय प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी उत्सुक

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी रशियातल्या कझानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इतर नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.    दरम्यान, रशियातल्या कझान इथला भारतीय समुदाय, विशेषतः विद्यार्थी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत.   आकाशवाणीच्या बातमीदारानं विद्यार्थिनीशी साधलेला संवाद.    [video width="848" height="478" mp4="https://www.newsonair.gov.in/wp-con...

October 20, 2024 9:44 AM

views 23

रशियाच्या व्यावसायिक क्षेत्रातील आणि ब्रिक्स व्यावसायिक मंचाच्या भारतीय प्रतिनिधींसाठी मेजवानी

भारत -रशिया यांच्यातील व्यावसायिक संबंध बळकट करण्याच्यादृष्टीनं मॉस्कोतल्या भारतीय दूतावासानं रशियाच्या व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर आणि ब्रिक्स व्यावसायिक मंचाच्या भारतीय प्रतिनिधींसाठी मेजवानीचं आयोजन केलं. यावेळी भारताचे रशियातील राजदूत विनय कुमार यांनी भारत आणि रशिया या दोन्ही देशांतील 80 हून अधिक अग्रणी उद्योजकांची भेट घेऊन त्यांच्याशी व्यापार आणि गुंतवणूकीच्या क्षमता तसंच धोरणात्मक भागीदारीच्या शक्यतांविषयी चर्चा केली