March 14, 2025 7:02 PM March 14, 2025 7:02 PM
13
अमेरिकेनं लादलेले निर्बंध हटवण्यासाठी चीन, रशिया आणि इराणची आण्विक चर्चेसाठी मागणी
चीन, रशिया आणि इराण या यांनी इराणवर अमेरिकेने लादलेले निर्बंध हटवण्यासाठी आणि आण्विक चर्चा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. या तिन्ही देशांच्या प्रतिनिधींनी बीजिंगमध्ये झालेल्या बैठकीत सर्व एकतर्फी बेकायदा निर्बंध उठण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. चीनचे उप परराष्ट्र मंत्री मा झाओक्सु, रशियाचे उप परराष्ट्र मंत्री रियाबकोव्ह सर्गेई अलेक्सेविच आणि इराणचे उप परराष्ट्र मंत्री काझेम गरीबाबादी यांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले. या निवेदनात परस्पर आदराच्या तत्त्वावर आधारित राजकीय सहभाग आणि संवाद हाच...