May 16, 2025 8:30 PM May 16, 2025 8:30 PM

views 33

तुर्कीयेमधे इस्तंबूल इथं रशिया आणि युक्रेनच्या शिष्टमंडळांची बैठक सुरु

तुर्कीयेमधल्या इस्तंबूल इथे रशिया आणि युक्रेनच्या शिष्टमंडळांची आज बैठक सुरु असून ही दोन्ही देशांमधली गेल्या तीन वर्षांमधली पहिली बैठक आहे. युक्रेनच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व संरक्षण मंत्री रुस्टम उमरोव्ह करत असून रशियाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व अध्यक्षांचे सहायक व्लादिमिर मेडिन्स्की करत आहेत. भविष्यात होणाऱ्या, दोन्ही देशांच्या अध्यक्षांच्या बैठकीसाठी पूर्वपीठिका तयार करण्याचं काम या बैठकीत होत आहे, असं तुर्कीयेचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान यांनी म्हटलं आहे. ते या बैठकीचे अध्यक्ष आहेत.   या...

May 15, 2025 3:23 PM May 15, 2025 3:23 PM

views 20

रशिया आणि युक्रेनचं शिष्टमंडळ शांततेसाठी संवाद साधणार

रशिया आणि युक्रेनचं शिष्टमंडळ आज तुर्कीए मध्ये इस्तंबूल इथं शांततेसाठी थेट संवाद साधणार आहेत. तीन वर्षांपूर्वी दोन्ही देशांमध्ये समोरासमोर चर्चा झाली होती.    दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन शांततेच्या चर्चेत सहभागी होणार नसून, त्याऐवजी, त्यांचे सहाय्यक व्लादिमीर मेडिन्स्की रशियन शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील, असं रशियानं स्पष्ट केलं आहे.    यापूर्वी, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी पुतिन यांना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसंच ही चर्चा य...

May 8, 2025 5:56 PM May 8, 2025 5:56 PM

views 16

रशियाचा आजपासून तीन दिवसीय युद्धविराम

रशियानं विजय दिवसाचं औचित्य साधून जाहीर केलेल्या तीन दिवसीय युध्दविरामाला आजपासून सुरुवात झाली. युक्रेनवर होत असलेल्या विशेष लष्करी मोहिमेला ७२ तासांची  तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी २८ एप्रिलला जाहीर केला होता. दरम्यान, युक्रेनच्या फौजांनी काल काही रशियन शहरांवर ड्रोन हल्ले केले. रशियन सैन्यानं त्याला प्रत्युत्तर दिलं. 

April 24, 2025 1:06 PM April 24, 2025 1:06 PM

views 47

कीववर रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात २ ठार, ५४ जण जखमी

यूक्रेनची राजधानी कीववर रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात दोन जण ठार तर ५४ जण जखमी झाले. जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. रशियाकडून केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे कीव शहरात ठिकठिकाणी आगी लागल्या. त्यामुळे निवासी इमारतींचं नुकसान झालं असून त्यांच्या ढिगाऱ्याखाली लोक अडकले असण्याची भीती यूक्रेनच्या प्रसार माध्यमांनी व्यक्त केली आहे. खारकिव शहरात बॉम्बस्फोट झाल्याचंही वृत्त आहे.

April 22, 2025 11:35 AM April 22, 2025 11:35 AM

views 35

इराणसोबत व्यापक धोरणात्मक भागीदारीला रशियाची मान्यता

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इराणसोबत व्यापक धोरणात्मक भागीदारीला मान्यता देणाऱ्या कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. 17 जानेवारी रोजी रशियामध्ये व्लादिमीर पुतिन आणि इराणी अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्यात झालेल्या शिखर परिषदेत सुरुवातीला या करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती, ज्यामध्ये उभय नेत्यांनी व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि प्रादेशिक पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये सहकार्य करण्याचं मान्य केलं होतं.

April 13, 2025 8:04 PM April 13, 2025 8:04 PM

views 9

भारत – रशिया राजनैतिक संबंधांना ७८ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्तानं सायकल रॅलीचं आयोजन

भारत आणि रशिया यांच्यातल्या राजनैतिक संबंधांना ७८ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्तानं आज नवी दिल्लीत एका सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत ३०० पेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले होते. यानिमित्तानं १९४१-१९४५ युद्धातल्या रशियाचा विजयोत्सवही साजरा केला गेला. भारतातले रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनीही यानिमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत. 

April 13, 2025 7:51 PM April 13, 2025 7:51 PM

views 10

रशियानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमधल्या ३२ नागरिकांचा मृत्यू, ८४ जण गंभीर

युक्रेनच्या ईशान्य भागातील सुमी शहरात आज रशियानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात दोन मुलांसह ३२ लोक ठार झाले तर, ८४ जण गंभीर जखमी झाले आहेत अशी माहिती युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. जखमींमध्ये दहा लहान मुलांचाही समावेश असल्याचं या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.  पाम संडेच्या निमित्तानं नागरिक मोठ्या संख्येनं चर्चमधल्या प्रार्थना सभेसासाठी जमले होते, तसंच रस्त्यांवरही मोठी गर्दी होती त्यावेळी हा हल्ला झाला. २०२३ नंतर रशियानं युक्रेनच्या नागरिकांवर केलेला हा सर्वात प्राणघातक हल्ला ठरला आहे.    ह...

April 12, 2025 1:07 PM April 12, 2025 1:07 PM

views 17

अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची घेतली भेट

अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची सेंट पीटर्सबर्ग इथं भेट घेतली. यावेळी युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्याबाबत त्यांच्यात चर्चा झाली. रशियाचे विशेष दूत किरील दिमित्रीव्ह यांनी ही चर्चा फलदायी झाल्याचं म्हटलं आहे. दरम्यान रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता चर्चेला होत असलेल्या विलंबाबद्दल, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल निराशा व्यक्त केली. ट्रम्प यांनी रशियाला युक्रेनसोबत युद्धबंदीच्या चर्चेला गती देण्याचं आवाहन केलं आहे.

March 31, 2025 10:22 AM March 31, 2025 10:22 AM

views 12

अमेरिकेचा रशियावर तीव्र संताप

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनमधील सुरू असलेल्या युद्धाबद्दल रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल पुतिन यांच्यावर टीका केली. रशिया युद्धबंदीला सहमत झाला नाही तर ते रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 50 टक्क्यांपर्यंत शुल्क लादतील असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. तसच युद्ध सुरूच राहिल्या...

March 18, 2025 10:28 AM March 18, 2025 10:28 AM

views 15

युक्रेन संघर्ष संपवण्यासंदर्भात अमेरिका – रशियामध्ये चर्चा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात युक्रेन संघर्ष संपवण्याबाबत आज चर्चा होणार आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी या चर्चेविषयी तयारी सुरु आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी संध्याकाळी याबाबत घोषणा केली. युक्रेनमधील युद्ध संपवण्याच्या प्रयत्नांतील हा एक भाग असून जमीन आणि वीज प्रकल्प हे चर्चेचे प्रमुख विषय असतील असंही त्यांनी नमूद केलं आहे.