May 31, 2025 7:55 PM May 31, 2025 7:55 PM

views 14

औपचारिक शांतता कराराशिवाय रशियाने युद्धबंदी फेटाळली

रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशातल्या संघर्षाची मूळ कारणं दूर होईपर्यंत आणि शांतता करारांना औपचारिक मान्यता मिळेपर्यंत युक्रेनमध्ये आपली लष्करी मोहीम सुरु ठेवणार असल्याचं रशियानं म्हटलं आहे. परस्पर देशांमध्ये औपचारिक आणि कायमस्वरपी करार होईपर्यंत कोणत्याही बिनशर्त युद्धबंदीला रशियाचा नकार असेल, असं रशियन स्टेट ड्युमाच्या संरक्षण समितीचे अध्यक्ष एंड्री कार्तापोलोव यांनी स्पष्ट केलं. रशिया पुन्हा कोणत्याही भ्रमांना बळी पडणार नसून मॉस्को त्यांचं आक्रमण सुरूच ठेवेल, असं त्यांनी सांगितलं.  पाश्चिमात्...

May 16, 2025 8:30 PM May 16, 2025 8:30 PM

views 34

तुर्कीयेमधे इस्तंबूल इथं रशिया आणि युक्रेनच्या शिष्टमंडळांची बैठक सुरु

तुर्कीयेमधल्या इस्तंबूल इथे रशिया आणि युक्रेनच्या शिष्टमंडळांची आज बैठक सुरु असून ही दोन्ही देशांमधली गेल्या तीन वर्षांमधली पहिली बैठक आहे. युक्रेनच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व संरक्षण मंत्री रुस्टम उमरोव्ह करत असून रशियाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व अध्यक्षांचे सहायक व्लादिमिर मेडिन्स्की करत आहेत. भविष्यात होणाऱ्या, दोन्ही देशांच्या अध्यक्षांच्या बैठकीसाठी पूर्वपीठिका तयार करण्याचं काम या बैठकीत होत आहे, असं तुर्कीयेचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान यांनी म्हटलं आहे. ते या बैठकीचे अध्यक्ष आहेत.   या...

February 18, 2025 11:08 AM February 18, 2025 11:08 AM

views 9

रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्धबंदीसाठी रियाध इथं बैठक

रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध बंदीसाठी आणि दोनही देशांचे संबंध सुधारण्यासाठी वाटाघाटी घडवून आणण्याच्या उद्देशानं दोन्ही देशांच्या वरिष्ठ नेत्यांसह, वरिष्ठ अमेरिकी आणि रशियाचे अधिकारी आज सौदी अरेबियात चर्चा करणार आहेत. तीन वर्षांपूर्वी युक्रेनमध्ये रशियानं केलेल्या लष्करी कारवाईनंतर ही दोन्ही पक्षांमधील सर्वात महत्त्वाची बैठक असेल. अशी माहिती रशियाच्या अध्यक्षांच्या कार्यालयाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी दिली आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह आणि परराष्ट्र व्यवहार सल्लागार युर...

December 31, 2024 1:05 PM December 31, 2024 1:05 PM

views 17

रशिया, युक्रेन हजारो युद्धकैद्यांची सुटका

संयुक्त अरब अमिरातीच्या मध्यस्थीनंतर, रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यान हजारो युद्धकैद्यांची सुटका करण्यात आली. रशियन संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, उभय देशांनी परस्परांच्या प्रत्येकी दीडशे लष्करी युद्धकैद्यांची सुटका केली. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेंक्सी यांनी 189 युक्रेनी नागरिक घरी परतल्याची माहिती दिली आहे. यामध्ये अझोव्हस्टार आणि मारियुपोलच्या बचाव सैनिक तसंच चेर्नोबिल अणु उर्जा संकल्प आणि स्नेक बेटांचाही समावेश आहे. रशियानं मे 2022 रशियानं दक्षिण-पूर्व युक्रेनमधील मारियुपो...

October 22, 2024 8:08 PM October 22, 2024 8:08 PM

views 14

रशिया – युक्रेन युद्धावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्याच्या भारताच्या भूमिकेचा प्रधानमंत्र्यांकडून पुनरुच्चार

रशिया आणि युक्रेन युद्धावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्याच्या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केला. शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना भारताचा नेहमीच पाठिंबा असेल. त्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचीही आमची तयारी असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबतच्या चर्चेत त्यांनी ही भूमिका मांडली. ब्रिक्स परिषदेच्या निमित्तानं रशियातल्या कझान शहरात त्यांची ही भेट झाली. कझान शहराशी भारताचे जुने संबंध आहेत. इथं भारताचा दु...

August 23, 2024 12:59 PM August 23, 2024 12:59 PM

views 19

प्रधानमंत्र्यांच्या युक्रेन भेटीमुळे रशिया-युक्रेन संघर्ष संपण्यास मदत होईल – संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या युक्रेन भेटीमुळे रशिया युक्रेन संघर्ष संपण्यास मदत होईल, अशी आशा संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांनी व्यक्त केली आहे. त्यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी म्हटलं आहे. अनेक देशांच्या प्रमुखांच्या भेटींसह सर्वसाधारण सभेचे ठराव, आंतरराष्ट्रीय कायदा आणि प्रादेशिक एकात्मतेसाठीचे प्रयत्न यामुळे हा संघर्ष थांबवण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा आहे. रशियानं लष्करी कारवाई थांबवावी अशी मागणी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं किमान तीन ठरावांमध्ये केली आहे, तर एका ठरावात युक्रेनच...