December 6, 2025 2:31 PM December 6, 2025 2:31 PM

views 8

रशियाच्या तेल निर्याती संबंधित पश्चिमी सागरी सेवांवर पूर्णपणे बंदी घालण्यासाठी सात देशांच्या गटाची आणि युरोपीय संघाची चर्चा

रशियाच्या तेल निर्याती संबंधित पश्चिमी सागरी सेवांवर पूर्णपणे बंदी घालण्यासाठी सात देशांच्या गटाने आणि युरोपीय संघाने चर्चा सुरू केली आह. याचा उद्देश युक्रेन विरोधात सुरू असलेल्या युद्धाला पुरवल्या जाणाऱ्या निधीला पायबंद घालणं हा आहे. सध्या रशियातून एक तृतीयांशहून अधिक तेल पश्चिमी टँकर्सच्या सहाय्याने भारत आणि चीनमध्ये निर्यात केलं जातं. वर्ष २०२६ च्या सुरुवातीला युरोपीय संघाच्या पुढच्या मंजूरी पॅकेजमध्ये याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.    

November 3, 2025 7:32 PM November 3, 2025 7:32 PM

views 12

इराणची आठ नवीन अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची घोषणा 

स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा उत्पादन वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून इराणने रशियाच्या मदतीने आठ नवीन अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची घोषणा  केली आहे. इराणच्या अणुऊर्जा संघटनेचे प्रमुख मोहम्मद इस्लामी यांनी ही माहिती दिली. बुशेहरमध्ये चार आणि त्याच्या उत्तर आणि दक्षिण किनारपट्टीवर चार अणुऊर्जा प्रकल्प बांधले जातील. उत्तर गोलेस्तान प्रांतात बांधकाम आधीच सुरू झालं आहे, तर खुजेस्तान प्रांतातला अपूर्ण अणुऊर्जा प्रकल्प देखील पूर्ण केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. देशाची अणुऊर्जा निर्मिती २० हजार मेगाव...

November 3, 2025 10:02 AM November 3, 2025 10:02 AM

views 10

रशियाच्या ‘खाब्रोवस्क’ या अण्वस्त्रधारी पाणबुडीचं जलावतरण

रशियानं आपल्या खाब्रोवस्क या अण्वस्त्रधारी पाणबुडीचं जलावतरण केलं आहे. पोझेडॉन किंवा डूमस्डे क्षेपणास्त्र हे आण्विक ड्रोन जल पृष्ठभागाखालून वाहून नेण्याच्या दृष्टीनं या अत्यंत घातक पाणबुडीची रचना करण्यात आली आहे. रशियन नौदलासाठी हे खूप महत्त्वाचं यश असल्याचं रशियाचे संरक्षणमंत्री आंद्रेई बेलोसोव्ह यांनी म्हटलं आहे.

October 28, 2025 9:35 AM October 28, 2025 9:35 AM

views 138

डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्र चाचणीवर टीका

रशिया आणि अमेरिकेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्र चाचणीची केलेली घोषणा योग्य नसल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे.  रशियाने त्यांच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या बुरेव्हेस्टनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याचं पुतीन यांनी सांगितलं. जगातल्या इतर कोणत्याही देशाकडे नसलेली ही यंत्रणा लष्करी सेवेत  आणण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा तयार करण्याची तयारी करण्याचे आदेश त्यांनी रशियाच्या लष्कर...

October 25, 2025 6:28 PM October 25, 2025 6:28 PM

views 46

यूक्रेनचे १२१ ड्रोन आपण नष्ट केल्याचं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं केलं जाहीर

यूक्रेनचे १२१ ड्रोन आपण नष्ट केल्याचं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केलं आहे. युक्रेननं रोस्तोव्ह, वोल्गोग्राड, ब्रायन्स्क, कलुगा, स्मोलेन्स्क, बेल्गोरोड, मॉस्को, वोरोनेझ, लेनिनग्राड, नोव्हगोरोड, रियाझान, तांबोव, टव्हर आणि तुला या भागांमध्ये हल्ला करण्यासाठी ड्रोन पाठवले होते. मात्र रशियाच्या संरक्षण दलानं काल रात्री ते यशस्वीपणे परतवून लावल्याचं यात म्हटलं आहे.    दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यां...

October 6, 2025 8:17 PM October 6, 2025 8:17 PM

views 47

रशिया आणि युक्रेनच्या अनेक भागात वीजपुरवठा खंडित

रशिया आणि युक्रेनमधे सुरू असलेल्या संघर्षामुळे दोन्ही देशांमधल्या अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला. युक्रेनने केलेल्या हल्ल्यामुळे रशियातील बेल्गरोद प्रदेशात वीजपुरवठा खंडित झाला, याचा फटका जवळपास ४० हजार नागरिकांना बसला आहे. अनेक रुग्णालयांमध्ये जनरेटर लावावं लागलं, असंख्य लोक जखमी झाले. दुसरीकडे रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनमधल्या पाच नागरिकांचा मृत्यू झाला.

October 3, 2025 1:43 PM October 3, 2025 1:43 PM

views 39

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर

भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन येत्या डिसेंबरमधे भारत दौऱ्यावर येणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्याशी चर्चा करतील. रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्री पेस्केव यांनी काल या वृत्ताला दुजोरा दिला. युक्रेन संघर्ष सुरू झाल्यानंरचा पुतीन यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल.

September 20, 2025 2:46 PM September 20, 2025 2:46 PM

views 43

रशियामध्ये सारातोव्ह आणि समारा प्रांतातल्या तेल शुद्धिकरण कारखान्यांवर यूक्रेनने ड्रोन हल्ला

रशियामध्ये सारातोव्ह आणि समारा प्रांतातल्या तेल शुद्धिकरण कारखान्यांवर यूक्रेनने ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर दोन्ही कारखान्यात स्फोट झाले आणि आग लागली.   रशियाच्या हल्ल्यांना थांबवण्यासाठी यूक्रेनने मॉस्कोच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या रशियाच्या तेल शुद्धिकरण आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले केल्याचं स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

September 20, 2025 2:32 PM September 20, 2025 2:32 PM

views 34

गाझा पट्ट्यातली हिंसा थांबवण्यात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला अद्याप यश मिळालं नसल्याबाबत रशियाने व्यक्त केला खेद

गाझा पट्ट्यातली हिंसा थांबवण्यात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला अद्याप यश मिळालं नसल्याबाबत रशियाने खेद व्यक्त केला आहे. रशियाच्या परराष्ट्रव्यवहार मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे, की या संदर्भात पुढे आलेल्या कोणत्याही प्रस्तावावर अमेरिका नकाराधिकाराचा वापर करीत असल्याने हे शक्य झालेलं नाही.   गाझामधे शस्त्रसंधी आणि मानवतावादी सहाय्याकरता प्रवेश याविषयीचा ठराव सुरक्षापरिषदेत गेल्या गुरुवारी पुन्हा एकदा अमेरिकेच्या नकाराधिकारामुळे बारगळला. त्याबाबत रशियाने ही प्रतिक्...

August 5, 2025 9:57 AM August 5, 2025 9:57 AM

views 1

रशियाकडून तेल आयातीबाबत भारताला लक्ष्य करणं अनुचित असल्याचं भारताचं स्पष्टीकरण

रशियाकडून तेल आयातीबाबत अमेरिका आणि युरोपीय महासंघानं भारताला लक्ष्य करणं अनुचित आणि तर्कहीन असल्याचं भारतानं म्हटलं आहे. कोणत्याही महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांसारखांच भारतही आपल्या राष्ट्रीय हिताचं आणि आर्थिक स्थैर्याचं संरक्षण करेल, असं ठाम प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केलं आहे. रशिया आणि युक्रेन संघर्षानंतर सर्व पारंपरिक पुरवठा युरोपाकडे वळल्यामुळे भारतानं रशियाकडून कच्चं तेल आयात करणं सुरू केल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. त्या वेळी अमेरिकेनंच अशा आय...