September 13, 2024 8:13 PM September 13, 2024 8:13 PM
13
५ अब्ज २५ कोटी डॉलरची वाढ होऊन देशाचा परकीय चलन साठा विक्रमी पातळीवर
देशाच्या परकीय चलन साठ्यात ५ अब्ज २५ कोटी डॉलरची वाढ होऊन तो ६८९ अब्ज २३ कोटी डॉलरच्या विक्रमी स्तरावर पोहचला, अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. गेल्या शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात दरम्यान, परदेशी चलन साठ्याचा महत्वपूर्ण घटक असणाऱ्या परदेशी चलन मालमत्तेत देखील ५ अब्ज ११ कोटी डॉलरची वाढ होऊन ती ६०४ अब्ज १४ कोटी डॉलरवर पोहोचली आहे. दरम्यान, देशाच्या सुवर्ण भांडाराचे आरक्षित मूल्य १२ कोटी ९ लाख डॉलरने वाढून ६१ अब्ज ९९ कोटी डॉलर इतकं झालं आहे. तर, आंतरराष्ट्रीय चलन साठ्यात देशाचा आरक्षि...