March 14, 2025 9:08 PM

views 24

RBI ला लंडनच्या सेंट्रल बँकिंग संस्थेचा 𝐃𝐢𝐠𝐢𝐭𝐚𝐥 𝐓𝐫𝐚𝐧𝐬𝐟𝐨𝐫𝐦𝐚𝐭𝐢𝐨𝐧 𝐀𝐰𝐚𝐫𝐝 जाहीर

भारतीय रिझर्व्ह बँकेला लंडनच्या सेंट्रल बँकिंग या संस्थेचा २०२५ या वर्षाचा 𝐃𝐢𝐠𝐢𝐭𝐚𝐥 𝐓𝐫𝐚𝐧𝐬𝐟𝐨𝐫𝐦𝐚𝐭𝐢𝐨𝐧 𝐀𝐰𝐚𝐫𝐝 जाहीर झाला आहे. बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विकसित केलेल्या प्रवाह आणि सारथी या सॉफ्टवेअर करता हा पुरस्कार मिळाला आहे. यामुळं रिझर्व्ह बँकेतल्या अनेक प्रक्रिया कागद विरहित झाल्या आहेत.

February 25, 2025 1:41 PM

views 23

खासगी कंपन्यांनी नफा कमावला, कर्ज कमी केलं – RBI

भारतातल्या खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षात नफा कमावला असून कर्जही कमी केल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या अहवालात दिली आहे. या कंपन्यांचा चालु गुंतवणूक नफा गेल्या वर्षी ४ पूर्णांक २ शतांश टक्के इतका होता, त्यात वाढ होऊन तो आता १५ पूर्णांक ३ दशांश टक्के झाला आहे. तर उत्पादन नफ्यात १३ पूर्णांक २ दशांश टक्क्यांची वाढ झाली आहे. सेवाक्षेत्रातलं उत्पादन ७ पूर्णांक ६ दशांश टक्क्यांवरून ३८ पूर्णांक १ दशांश टक्के इतकं झालं आहे, असंही या अहवालात म्हटलं आहे. सार्वजनिक क्षे...

February 22, 2025 10:19 AM

views 29

नियमांचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने काही वित्तीय संस्थांना दंड ठोठावला

कर्जविषयक माहिती देण्यासंबंधीच्या निर्देशांचं पालन न केल्याबद्दल काही वित्तीय संस्थांना रिझर्व्ह बँकेने काल दंड ठोठावला. यात सिटीबँकेला 29 लाख रुपये, आशिर्वाद मायक्रो फायनान्स कंपनीला सहा लाख वीस हजार आणि जेएम फायनान्शियल होम लोन लिमिटेडला एक लाख पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. वेगवेगळ्या श्रेणीतील कर्जदारांकडून वेगवेगळे व्याजदर आकारण्याची कारणे न देणे, आणि नियामक अनुपालनातील त्रुटींमुळे ही कारवाई करण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.

February 21, 2025 3:20 PM

views 26

लघुकालीन नफ्याच्या मागे धावताना नागरिकांनी दीर्घकालीन वित्तीय सुरक्षेकडे दुर्लक्ष करु नये- RBI

लघुकालीन नफ्याच्या मागे धावताना नागरिकांनी दीर्घकालीन वित्तीय सुरक्षेकडे दुर्लक्ष करु नये, असा सल्ला रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एम. नागेश्वर राव यांनी दिला आहे. मुंबईत राष्ट्रीय शेअर बाजारात आयोजित आर्थिक परिषदेत ते बोलत होते. नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरतेचा अभाव असल्यानं या गोष्टी होतात.   आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी रिझर्व्ह बँक इतर वित्तीय नियामकांसोबत काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.बँका आणि वित्तीय संस्थांनी डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली नाही, ग्राहककेंद्री ...

February 14, 2025 6:54 PM

views 22

न्यू इंडिया सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त

रिझर्व्ह बँकेनं आज मुंबईतल्या न्यू इंडिया सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त केलं. प्रशासनाचा दर्जा खालावल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. रिझर्व्ह बँकेनं न्यू इंडिया सहकारी बँकेवर काल विविध निर्बंध लागू केले होते. त्यानुसार बँकेला पुढले सहा महिने नवीन कर्ज देता येणार नाही तसंच बचत खातं, चालू खातं किंवा ठेवीदाराच्या इतर कुठल्याही खात्यातून रक्कम काढता येणार नाही.    स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी मुख्य महाव्यवस्थापक श्रीकांत, यांची बँकेच्या कारभाराचं व्यवस्थापन करण्यासाठी 'प्रशासक' म्हणून नियुक्त...

February 12, 2025 9:21 PM

views 29

रिझर्व्ह बँकेनं कोटक महिंद्रा बँकेवर लादलेले निर्बंध हटवले

रिझर्व्ह बँकेनं कोटक महिंद्रा बँकेवर गेल्यावर्षी लादलेले निर्बंध हटवले आहेत. नवीन ग्राहक स्वीकारणे, नवे क्रेडिट कार्ड देणे यासारख्या गोष्टींवर हे निर्बंध होते. मात्र सर्व नियामकीय पूर्तता पूर्ण केल्यामुळे आणि आवश्यक उपाययोजना केल्यानं रिझर्व्ह बँकेनं हे निर्बंध हटवले.

February 7, 2025 8:23 PM

views 25

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दरात पाव टक्के कपात, आर्थिक वृद्धी दर ६ पूर्णांक ४ दशांश टक्के राहण्याचा अंदाज

सर्वसामान्य कर्जदारांना दिलासा देत भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात पाव टक्के कपात केली. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत एकमतानं हा निर्णय झाला. त्यामुळं रेपो दर साडे ६ टक्क्यावरुन सव्वा ६ टक्के झाल्याची माहिती गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली. या समितीच्या निर्णयांविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून. जागतिक पातळीवरच्या अस्थिर परिस्थितीचं कारण देत रिझर्व्ह बँकेनं आज आर्थिक वृद्धीदरांचा अंदाजही खाली आणला. त्यानुसार चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर ६ पूर्णांक...

January 16, 2025 7:35 PM

views 17

आरबीआयनं डिफेन्स अकाऊंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेवरचे निर्बंध हटवले

रिझर्व्ह बँकेनं डिफेन्स अकाऊंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेवरचे निर्बंध आजपासून हटवले आहेत. गेल्यावर्षी मार्च महिन्यात बँकेवर निर्बंध लादले होते. मात्र बँकेच्या वित्तीय परिस्थितीची तपासणी केल्यानंतर निर्बंध हटवण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे.

December 31, 2024 1:26 PM

views 18

बँक ग्राहकांना प्राप्तकर्त्याचं नाव आणि खात्याच्या तपशीलांची पडताळणी करता येणार

चुकीच्या  बँक खात्यात निधी हस्तांतरण होऊ नये यासाठी लाभार्थीच्या खात्याचं नाव पडताळण्याची सुविधा आता उपलब्ध होणार आहे. रिझर्व्ह बँकेनं यासंदर्भात निवेदन जारी केलं आहे. आर टी जी एस आणि एन ई एफ टी प्रणाली तर्फे पैसे हस्तांतर करण्यापूर्वी या सुविधेचा वापर करता येईल.   इंटरनेट बँकिंग तसंच  मोबाइल बँकिंग सुविधेचा वापर करताना ग्राहकांना प्राप्तकर्त्याचं नाव आणि खात्याचे तपशील यांची पडताळणी करता येईल.    येत्या १ एप्रिलपासून ही सुविधा सुरु होणार असून त्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडि...

December 27, 2024 2:46 PM

views 15

देशातल्या बँकांच्या नफ्यात सलग सहा वर्षं वाढ झाल्याची रिझर्व्ह बँकेच्या अहवालात माहिती

देशातल्या बँकांच्या नफ्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षापर्यंत सलग सहा वर्षं वाढ झाली असून, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीतही वाढीचा कल कायम असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेनं देशातील बँकिंग आणि त्यातला कल याबाबतचा एक अहवाल काल प्रसिद्ध केला, त्यात ही माहिती देण्यात आली आहे. बँकांच्या मालमत्तेची गुणवत्ता सुधारत राहिली असून, अनुत्पादित कर्जांचं प्रमाण १३ वर्षांतील सर्वांत कमी पातळीवर राहिलं. चालू वर्षाच्या मार्च अखेरीला एनपीए २ पूर्णांक ७ दशांश टक्के आणि सप्टेंबरच्या अखे...