December 5, 2024 8:17 PM December 5, 2024 8:17 PM

रत्नागिरीत उद्यापासून ८ डिसेंबरपर्यंत संगीत कला महोत्सव

रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातल्या श्री कर्णेश्वर मंदिराच्या प्रांगणात कलांगण आयोजित तिसरा संगीत कला महोत्सव उद्यापासून ८ डिसेम्बरपर्यंत रंगणार आहे. राज्य शासनाच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालयाच्या सौजन्याने होणाऱ्या या महोत्सवात संवादिनीगंधर्व पंडित गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अनेक कलाकार आपली कला सादर करणार आहेत. या महोत्सवाच्या कालावधीत सावर्ड्याचं सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट आणि देवरूखचं डी-कॅड कॉलेज यांचं चित्र आणि कला प्रदर्शनही रसिकांना पाहता येणार आहे.  

November 14, 2024 8:14 PM November 14, 2024 8:14 PM

views 9

राज्यात गृहमतदानाला चांगला प्रतिसाद

रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाच विधानसभा मतदारसंघांमधले ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले ३ हजार ५८३ मतदार आणि ५९२ दिव्यांग मतदारांसाठी आजपासून गृहमतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात कुवारबाव इथे राहणाऱ्या ९२ वर्षं वयाच्या मतदार जयश्री नाईक यांनी गृहमतदानाच्या सुविधेचा लाभ घेऊन मतदानाचं कर्तव्य बजावलं. तसंच ८८ वर्षांचे शांताराम देशपांडे यांनीही गृहमतदानाच्या सुविधेचा लाभ घेतला.   कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व १० विधानसभा मतदारसंघात गृहमतदानाला आज सुरूवात झाली. वयोवृद्ध म...

November 11, 2024 4:03 PM November 11, 2024 4:03 PM

views 12

रत्नागिरी जिल्ह्यात थंडीला सुरूवात

रत्नागिरी जिल्ह्यात दिवाळीपर्यंत सुरु असलेल्या पावसानंतर आता थंडी सुरु झाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पहाटेच्या वेळी धुकं पडत असून तापमानात चार ते पाच अंशांनी घट झाली आहे. दापोलीत १५ पूर्णांक ९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं केली आहे. थंडीमुळे आंबा पिकासाठी पोषक वातावरण असून काही ठिकाणी पालवी यायला सुरुवात झाली आहे. भातकापणीची कामं काही ठिकाणी अजूनही सुरू आहेत. पावटा, हरभरा, मूग अशा कडधान्यांसह मिरची, वांगी, पालेभाजी आदींची लागवड...

November 10, 2024 3:16 PM November 10, 2024 3:16 PM

views 15

रत्नागिरीत मतदार जनजागृतीसाठी मॅरेथॉनचं आयोजन

मतदार जनजागृतीसाठी आज रत्नागिरी शहरात मॅरेथॉन आयोजित केली होती. पोलीस मैदानातून सुरू झालेल्या या मॅरेथॉनची सांगता भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर झाली. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व नागरिकांनी ब्रँड अँबेसेडर म्हणून काम करावं, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं. जिल्ह्यात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या जास्त आहे, मात्र त्यांची मतदानाची टक्केवारी कमी असते, असं सांगत जिल्ह्यातली मतदानाची टक्केवारी वाढण्याकरता सर्वांनी मतदानात सहभागी होणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.

November 6, 2024 7:32 PM November 6, 2024 7:32 PM

views 18

आचारसंहिता लागू झाल्यापासून रत्नागिरीत ६६ गुन्हे दाखल, ५१ आरोपी अटक

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागानं रत्नागिरी जिल्ह्यात ६६ गुन्हे दाखल केले असून ५१ आरोपींना अटक केली आहे. यात १४०० लिटर गावठी हातभट्टीच्या दारूसह देशी आणि विदेशी मद्याचा मोठा साठा आणि २७ हजार लिटर रसायन जप्त करण्यात आलं आहे. जप्त केलेल्या मालाचं एकूण मूल्य १ कोटी १९ लाख रुपयांहून अधिक असल्याचं राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांनी सांगितलं. ४ पथकांद्वारे महामार्गांवर संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे.

October 20, 2024 7:02 PM October 20, 2024 7:02 PM

views 11

रत्नागिरी जिल्ह्यातल्या रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धेत सांगलीचा अमन तांबोळी विजेता

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबनं आज, रत्नागिरी तालुक्यातल्या भाट्ये ते गावखडी या किनारी मार्गावर दुसरी रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धा आयोजित केली होती.  स्पर्धेच्या खुल्या गटात सांगलीचा अमन तांबोळी विजेता ठरला. अमननं ४८ किलोमीटर अंतर एक तास १६ मिनिटांमध्ये पार  केलं. ५५ वर्षांवरच्या पुरुष गटात पुण्याचे प्रशांत तिडके, तर महिला गटात सांगलीच्या योगेश्वरी कदम यांनी विजेतेपद पटकावलं. मास्टर्स गटात मुंबईचा अनूप पवार विजयी झाला. सांगलीतले ८१ वर्षांचे सायकलिस्ट भीमराव सूर्यवंशी आणि मुंबईतल्या ६७ वर्षांच्या मं...

October 17, 2024 6:57 PM October 17, 2024 6:57 PM

views 6

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर राज्यातल्या सर्व जिल्ह्यात निवडणूकपूर्व तयारीला सुरुवात झाली आहे.    रत्नागिरी जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपास नाके उभारण्यात आले असून सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची १२० जवानांची तुकडी जिल्ह्यात तैनात करण्यात येणार आहे. तसंच सर्व मतदार केंद्रावर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करू...

October 14, 2024 3:29 PM October 14, 2024 3:29 PM

views 14

राज्य शिक्षण मंडळाच्या कोकण विभागाच्या प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन

रत्नागिरी शहराजवळच्या कुवारबाव इथं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळाच्या नियोजित प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं.   कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी आज रत्नागिरी रेल्वेस्थानकासमोरच्या श्रमशक्ती स्मारकात पुष्पचक्र अर्पण करून दिवंगत कामगारांना आदरांजली वाहिली. कोकण रेल्वेमार्गाची उभारणी करताना कामगार, अभियंते आणि अधिकाऱ्यांनी प्राण गमावले, त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी १४...

October 11, 2024 7:36 PM October 11, 2024 7:36 PM

views 9

रत्नागिरीतल्या १९,५५० कोटी रुपयांच्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचं भूमिपूजन

रत्नागिरी तालुक्यातल्या झाडगाव एमआयडीसी क्षेत्रात १९ हजार ५५० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असलेल्या वेल्लोर सेमीकंडक्टर प्रकल्पाचं भूमिपूजन आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं. कंपनीतर्फे रत्नागिरीतल्या दीड हजार युवकांना परदेशात प्रशिक्षण देऊन इथल्या प्रकल्पात नोकरी मिळणार आहे.    मुलांनी शिकून परदेशात नोकरी करावी, असं अनेकांचं स्वप्न असतं. ते स्वप्न या प्रकल्पामुळे रत्नागिरीतच पूर्ण होणार आहे, असं सामंत यांनी सांगितलं. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे...

October 10, 2024 4:35 PM October 10, 2024 4:35 PM

views 11

रत्नागिरी जिल्ह्यातली ४२ गावं क्षयरोगमुक्त

रत्नागिरी जिल्ह्यातली ४२ गावं क्षयरोगमुक्त झाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काल या ग्रामपंचायतींचा सत्कार केला. २०२५ पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं ठेवलं आहे, त्यानुसार क्षयरोगमुक्त पंचायत ही मोहीम राबवली जात आहे. या सर्व ग्रामपंचायतींनी यात सक्रीय सहभाग घेत मोहीम यशस्वी केली.