April 6, 2025 8:41 PM April 6, 2025 8:41 PM
4
देशभरात रामनवमीचा उत्साह
आज प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस म्हणजेच रामनवमी देशभरात उत्साहात साजरी केली जात आहे. अयोध्येतल्या राममंदिरासह देशातल्या विविध ठिकाणच्या राममंदिरांमध्ये दुपारी बारा वाजता रामजन्म सोहळा साजरा झाला. जगाच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येत भाविक येत आहेत. देशभरात ठिकठिकाणी भजन, कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून गावागावांमधून शोभायात्रादेखील काढल्या जात आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रामनवमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. रामनवमी आपल्या...