April 1, 2025 8:44 PM

views 31

RajyaSabha : विमान उपकरणं हितसंबंध संरक्षण विधेयक २०२५ मंजूर

विमान उपकरणं हितसंबंध संरक्षण विधेयक २०२५ आज राज्यसभेत मंजूर झालं. भारत हा जगातला तिसरा सर्वात मोठा देशांतर्गत नागरी विमान वाहतूक बाजार असलेला देश असल्याचं, विधेयकावरल्या चर्चेला उत्तर देताना नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितलं. गेल्या दहा वर्षांत विमान वाहतूक क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे, असं ते म्हणाले.   त्रिभुवन सहकारी विद्यापीठ  विधेयक आज राज्यसभेत विचारार्थ आणि मंजुरीसाठी मांडण्यात  आलं. आनंद ग्रामीण व्यवस्थापन संस्थेला त्रिभुवन विद्यापीठ म्हणून प्रस्थापित करणं ह...

March 28, 2025 8:13 PM

views 27

राज्यसभेत विमान संबंधित वस्तू हितरक्षण विधेयक २०२५ वर चर्चा

राज्यसभेत विमान संबंधित वस्तू हितरक्षण विधेयक २०२५ वर आज चर्चा झाली. काँग्रेसचे खासदार नीरज डांगी यांनी ‘उडान’ योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. विमानतळांचं खाजगीकरण आणि वाढलेल्या विमान प्रवास भाड्याचा मुद्दा तसंच विमान रुग्णवाहिकांची सेवा देशभरात उपलब्ध होण्याची गरज त्यांनी मांडली. भारतातली अंतर्देशीय विमानसेवा बाजारपेठ जगभरातली तिसऱ्या क्रमांकाची मोठी बाजारपेठ असल्याचं राष्ट्रवादी चे खासदार प्रफुल पटेल यांनी सांगितलं. देशात २०१४ साली फक्त ७४ विमानतळ होते, त्यांची संख्या वाढून आता १४९ झाली आहे,...

March 20, 2025 3:21 PM

views 32

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

लोकसभेत आज सरकारविरोधी घोषणा छापलेले कपडे घालून विरोधी पक्ष सदस्य सभागृहात आले होते. सभापती ओम बिरला यांनी त्याला हरकत घेतली. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनरर्चनेला विरोध दर्शवणाऱ्या घोषणा छापलेले कपडे परिधान करुन द्रमुकचे सदस्य सभागृहात आले होते. त्यांनी सभागृहाबाहेर जावं असं सभापतींनी सांगितलं, पण तसं न करता विरोधी पक्ष सदस्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. गदारोळामुळे सभापतींनी कामकाज २ वाजेपर्यंत, आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं.   राज्यसभेत  अध्यक्ष जगदीप धनखड यांनी आधी एकदा १२ वा...

March 18, 2025 2:47 PM

views 28

मनरेगा अंतर्गंत मजुरांना वेतन आणि कामाच्या दिवसांची संख्या वाढवण्याची सोनिया गांधींची मागणी

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा - मनरेगा अंतर्गंत मजुरांना कायद्यानुसार किमान वेतन आणि त्यांच्या कामाच्या दिवसांची संख्या वाढवण्याची मागणी खासदार सोनिया गांधी यांनी राज्यसभेत शून्य प्रहारात केली.    केंद्र सरकार मनरेगा पद्धतशीरपणे कमकुवत करत असल्याचा आरोपही गांधी यांनी यावेळी केला. गरीबांसाठी वरदान ठरलेली मनरेगा योजना पुढं चालू ठेवण्यासाठी तसंच त्याची  व्याप्ती वाढवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली.

March 17, 2025 5:50 PM

views 31

औष्णिक वीज क्षमता येत्या २०३२ पर्यंत ८० हजार मेगावॅटपर्यंत नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील-ऊर्जा राज्यमंत्री

देशाची वीज उत्पादन क्षमता गेल्या १० वर्षांत वाढून २३४ गिगावॅट झाली असून  सरकारने देशाला ऊर्जाटंचाईतून बाहेर काढून अतिरिक्त ऊर्जापुरवठ्याच्या दिशेने नेल असल्याचं  केंद्रीय ऊर्जाराज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज राज्यसभेत स्पष्ट केलं. देशाची औष्णिक वीज क्षमता  येत्या २०३१-३२ पर्यंत ८० हजार मेगावॅट पर्यंत नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं.

March 17, 2025 5:47 PM

views 24

रेल्वे सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील-रेल्वेमंत्री

रेल्वेमध्ये गेल्या १० वर्षांत  ५ लाख रोजगारनिर्मिती झाली असून रेल्वे सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते आज राज्यसभेत बोलत होते. रेल्वेच्या प्रवासी भाड्यात २०२० पासून वाढ झाली नसून आसपासच्या अनेक देशांपेक्षा भारतातला रेल्वेप्रवास अधिक किफायतशीर असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. रेल्वे अपघातांच्या प्रमाणात २००५-०६ च्या तुलनेत ९० टक्क्यांची घट  झाल्याचं त्यांनी सांगितलं. नुकत्याच झालेल्या महाकुंभमेळ्यात सुमारे साडेचार कोटी प्रवा...

March 12, 2025 3:25 PM

views 28

देशातल्या दूध उत्पादनात साडे ६३ टक्के वाढ – मंत्री राजीव रंजन सिंह

गेल्या १० वर्षात देशातल्या दूध उत्पादनात साडे ६३ टक्के वाढ झाली असल्याची माहिती दुग्धव्यवसाय विकास मंत्री राजीव रंजन सिंग यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिली. दरडोई दुग्धसेवनाबाबत भारताचा जगात पहिला क्रमांक असल्याचं त्यांनी सांगितलं.   राज्यसभेत आज रेल्वे विषयी चर्चा सुरु झाली. भाजपाचे सामिक भट्टाचार्य यांनी चर्चेचा प्रारंभ करताना सांगितलं, अर्थसंकल्पात रेल्वेसाठी विक्रमी तरतूद करण्यात आली असून  त्यामुळे रेल्वेचा कायापालट होणार आहे. वंदे भारत आणि अमृत भारत सारख्या गाड्यांनी वेग,...

February 3, 2025 8:34 PM

views 16

शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारनं महत्त्वपूर्ण पावलं उचललं-किरण चौधरी

राज्यसभेत चर्चेला सुरुवात करताना भाजपा खासदार किरण चौधरी यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पावलं उचलल्याचं प्रतिपादन केलं. कृषी क्षेत्रासाठी सरकारने प्रयत्न केल्यानंतरही विरोधी पक्ष सरकारविरुद्ध खोटा प्रचार करत असल्याची टीकाही चौधरी यांनी केली.  राज्यसभेतले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या चर्चेवेळी बेरोजगारी, महागाई आणि रुपयाची घसरण हे मुद्दे यावेळी उपस्थित केले. दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या मिळतील, असं आश्वासन सरकारने दिलं होतं, मात्र, ...

February 3, 2025 5:46 PM

views 19

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर राज्यसभेत चर्चा

संसदेच्या संयुक्त अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर आज राज्यसभेत चर्चा झाली. चर्चेला सुरुवात करताना भाजपा खासदार किरण चौधरी यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पावलं उचलल्याचं प्रतिपादन केलं. कृषी क्षेत्रासाठी सरकारने प्रयत्न केल्यानंतरही विरोधी पक्ष सरकारविरुद्ध खोटा प्रचार असल्याची टीकाही चौधरी यांनी केली. यूपीए सरकारने डॉक्टर स्वामिनाथन समितीच्या शिफारसी थंड बस्त्यात ठेवल्या होत्या, अशी टीका करतानाच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व...

December 19, 2024 3:07 PM

views 19

संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या विधानावरुन आज सलग दुसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे गदारोळ झाला. घोषणाबाजीमुळे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत कामकाज सुरु झाल्यावर काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पार्टी, आणि इतर पक्षांचे सदस्य अमित शाह यांच्या विरोधात घोषणा देऊ लागले. काही सदस्य सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत शिरले. घोषणा चालूच राहिल्याने सभापती ओम बिरला यांनी आधी दुपारी २ वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं. त्यानंतरही गदारोळ चाल...