गेल्या १० वर्षात देशातल्या दूध उत्पादनात साडे ६३ टक्के वाढ झाली असल्याची माहिती दुग्धव्यवसाय विकास मंत्री राजीव रंजन सिंग यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिली. दरडोई दुग्धसेवनाबाबत भारताचा जगात पहिला क्रमांक असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यसभेत आज रेल्वे विषयी चर्चा सुरु झाली. भाजपाचे सामिक भट्टाचार्य यांनी चर्चेचा प्रारंभ करताना सांगितलं, अर्थसंकल्पात रेल्वेसाठी विक्रमी तरतूद करण्यात आली असून त्यामुळे रेल्वेचा कायापालट होणार आहे. वंदे भारत आणि अमृत भारत सारख्या गाड्यांनी वेग, क्षमता आणि आरामदायी प्रवासाचं नवं युग सुरु केलं आहे, असं ते म्हणाले. काँग्रेसचे अनिलकुमार यादव यांनी काँग्रेसच्या सत्ताकाळात रेल्वेचं जाळं आणि प्रवाशांसाठी सुविधा विकसित करण्याकरता झालेल्या प्रयत्नांची माहिती दिली.