November 27, 2025 6:45 PM November 27, 2025 6:45 PM

views 6

उद्धव-राज यांची भेट

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीतल्या जागावाटपाबाबत दोन्ही नेत्यांमधे चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. मतदारयाद्यांमधल्या त्रुटी तसंच मनसेचा समावेश महाविकास आघाडीत करण्याबाबत काँग्रेसच्या विरोधी भूमिकेबाबतही दोघांनी चर्चा केली. बृहन्मुंबई महानगरपालिका, नाशिक आणि पुणे महानगरपालिकेसाठी दोन्ही पक्षांची आघाडी महत्त्वाची मानली जात...

August 21, 2025 3:15 PM August 21, 2025 3:15 PM

views 12

राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई शहरातल्या वाढत्या वाहतूक कोंडींच्या समस्येवर उपाययोजना सुचवण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची भेट घेतली. शहराच्या मूळ समस्येकडे दुर्लक्ष करुन कबुतरे, हत्ती या विषयांकडे अधिक लक्ष देण्याबाबत त्यांनी टीका केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचं त्यांनी राज ठाकरे यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 

July 5, 2025 8:15 PM July 5, 2025 8:15 PM

views 12

मराठीच्या मुद्द्यावर एकजूट कायम राखण्याचं राज आणि उद्धव ठाकरे यांचं आवाहन

मराठीच्या मुद्द्यावर राज्यातल्या सर्व नागरिकांनी पक्षीय मतभेद दूर करुन एकत्र यावं असं आवाहन राज आणि उद्धव ठाकरे यांनी आज केलं. मुंबईत वरळीत झालेल्या विजयी मेळाव्यात ते बोलत होते. राज ठाकरे यांच्या भाषणानं या मेळाव्याला सुरुवात झाली. राज्यातल्या जनतेला आधी भाषेवरून आणि नंतर जातीपातींमध्ये विभागण्याचा डाव असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे इंग्रजी माध्यमातून शिकले होते, मात्र त्यांच्या मराठीच्या प्रेमावर कुणालाही शंका घ्यायला जागा नव्हती, याकडे त्यांनी लक्ष वेधल...

February 21, 2025 7:28 PM February 21, 2025 7:28 PM

views 11

राज ठाकरेंनी घेतली मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली. या भेटीत दोन विषयांवर चर्चा झाल्याची माहिती ठाकरे यांनी या भेटीनंतर माध्यमांना दिली. सध्या मुंबई महानगरपालिका तोट्यात असून तोटा कमी करण्यासाठी मुंबई शहराच्या जमिनीखालून जाणाऱ्या विविध कंपन्यांच्या केबल्सवर कर आकारणी करावी, याबाबत आयुक्तांशी चर्चा झाल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले.    तसंच, मुंबईत पालिका रुग्णालयांवर दुसऱ्या शहर किंवा परराज्यातून येणाऱ्या रुग्णांचा अतिरिक्त ताण पडत आहे. त्याचा आर्...

February 10, 2025 3:15 PM February 10, 2025 3:15 PM

views 12

मुख्यमंत्र्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भेटीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. लोकसभेत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता, मात्र विधानसभेची निवडणूक मनसेने स्वबळावर लढवली होती. अलिकडेच राज ठाकरे यांनी विधानसभेत महायुतीला मिळालेल्या मतांवर शंकाही उपस्थित केली होती. 

January 30, 2025 7:35 PM January 30, 2025 7:35 PM

views 6

विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मनसेनेला केलेलं मतदान पोहोचलंच नाही- राज ठाकरे

विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान केलं, मात्र ते पोहोचलंच नाही, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मुंबईत वरळी इथं पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात ते आज बोलत होते. लोकसभा निवडणुकीत ज्या पक्षांचे जास्त उमेदवार निवडून आले होते, त्यांचे विधानसभेत अगदी थोडे उमेदवार निवडून आले, यावर विश्वास बसत नाही असं ठाकरे म्हणाले. असं होणार असेल तर निवडणूक न लढलेली बरी असं म्हणत ठाकरे यांनी निराशा व्यक्त केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम जनतेपर्यंत पोहोचवलं पाहिजे, असं आवाह...

November 10, 2024 6:17 PM November 10, 2024 6:17 PM

views 8

महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी हाती सत्ता द्या, राज ठाकरेंचं आवाहन

पुणे शहरातही आज विविध पक्षाच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. मला खुर्चीचा किंवा सत्तेचा सोस नाही, तर महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करायचंय, म्हणून माझ्या हाती एकदा सत्ता द्या, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ते आज पुण्यात आयोजित प्रचार सभेत बोलत होते.    गेल्या पाच वर्षातलं राजकारण आणि नेतेमंडळींचे वागणं किळसवाणं आहे. हे असंच चालू राहिलं, तर येत्या काळात महाराष्ट्राचं आणखी वाटोळं होईल, अशी टीका त्यांनी केली.

November 8, 2024 7:10 PM November 8, 2024 7:10 PM

views 17

कोकणात बदल हवा असेल, तर मनसेच्या उमेदवारांना स्वीकारा – राज ठाकरे

'कोकणात बदल हवा असेल, तर आतापर्यंत ज्यांना मतदान करत आला आहात त्यांना नाकारा आणि मनसेच्या उमेदवारांना स्वीकारा, असं आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं. ते आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर इथल्या पाट-पन्हाळे इथं प्रचार सभेत बोलत होते. यावेळी मनसेचे उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

November 6, 2024 3:12 PM November 6, 2024 3:12 PM

views 12

आपलं सरकार फुकट गोष्टी देण्याऐवजी महिलांना सक्षम करेल – राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यवतमाळच्या राळेगाव इथल्या सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. यावेळी लाडकी बहीण योजनेवरुनही त्यांनी टीका केली. आपलं सरकार असल्या फुकट गोष्टी देण्याऐवजी महिलांना सक्षम करेल आणि त्यांच्या हाताला काम देईल असाही विश्वास त्यांनी दिला. विकासाची ब्लु प्रिंट मांडणारा पहिला पक्ष मनसे आहे असंही त्यांनी सांगितले.

November 5, 2024 2:36 PM November 5, 2024 2:36 PM

views 17

मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज विदर्भात प्रचार दौऱ्यावर आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि राळेगाव मतदारसंघातील उमेदवारांसाठी त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. राळेगाव इथं चार वाजता मनसेचे उमेदवार अशोक मेश्राम यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला राज ठाकरे संबोधित करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता मनसेचे वणी इथले उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची शासकीय मैदानावर जाहीर सभा होणार आहे.