October 13, 2025 8:03 PM October 13, 2025 8:03 PM

views 44

रेल्वे पोलीस दलातली भरती कर्मचारी निवड आयोगाद्वारे करण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा

आरपीएफ अर्थात रेल्वे पोलीस दलातल्या पदांसाठी यापुढे कर्मचारी निवड आयोगाद्वारे भर्ती केली जाईल, अशी घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. गुजरातमध्ये वलसाड इथे रेल्वे पोलीस दलाच्या एकेचाळीसाव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आरपीएफशी संबंधित विविध उपक्रमांचा प्रारंभ केला. रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांकडे आता अत्याधुनिक उपकरणं दिली जातील, तसंच त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी त्यांना प्रगत प्रशिक्षण दिलं जाईल, अशी घोषणाही रेल्वे मंत्र्यांनी यावेळी के...

February 10, 2025 10:11 AM February 10, 2025 10:11 AM

views 16

रेल्वे विभागात नव्यानं 95 हजार पदांची भरती करण्यात येणार -रेल्वेमंत्री

रेल्वे विभागात नव्यानं 95 हजार पदांची भरती करण्यात येईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल बिहारमधील बेतिहा इथं सांगितलं. नुकत्याच झालेल्या दिड लाख भरतीप्रक्रियेव्यतिरिक्त या जागांची भरती होईल असंही त्यानी स्पष्ट केलं.   नमो आणि वंदे भारत रेल्वेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन या रेल्वेगाड्यांचं उद्पादन वाढवण्याचा सरकारचा विचार आहे. बिहारमध्ये सरकार 95 हजार पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून त्यामुळे बिहार रेल्वेक्षेत्रात मोठा बदल अपेक्षित आहेत असंही ते म्हणाले.