December 20, 2025 1:25 PM December 20, 2025 1:25 PM

views 11

नॅशनल हेराल्ड प्रकरणी आरोपपत्र फेटाळण्याच्या निर्णयाला EDचं आव्हान

ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयानं नॅशनल हेराल्ड प्रकरणी आरोपपत्र फेटाळण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह इतरांवर ईडीनं आरोपपत्र दाखल केलं होतं. दिल्लीतल्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं हे आरोपपत्र फेटाळलं होतं मात्र याप्रकरणी तपास सुरू ठेवण्याची मुभा दिली होती. आरोपपत्र फेटाळण्याच्या या निर्णयाला स्थगिती देण्याची ईडीची मागणी आहे.

December 9, 2025 8:20 PM December 9, 2025 8:20 PM

views 15

निवडणूक यंत्रणेत सुधारणा करण्याची सरकारची इच्छा नसल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

निवडणूक यंत्रणेत सुधारणा करणं फार सोपं आहे, पण सरकारला ते करायचं नाही, असा आरोप लोकसभेतले विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला. लोकसभेत निवडणूक सुधारणांवरच्या चर्चेदरम्यान ते बोलत होते. निवडणुकीपूर्वी एक महिना आधी मतदार याद्या राजकीय पक्षांना द्याव्यात, मतदानाचं सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याबाबतचा कायदा रद्द करावा, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची रचना कशी आहे, हे बघू द्यावं आणि निवडणूक आयुक्त पदावर असताना त्यांना कायद्यापासून संरक्षण देणारा कायदा मागे घ्यावा, अशा चार मागण्या त्यांनी सभागृहासमोर ...

September 18, 2025 7:54 PM September 18, 2025 7:54 PM

views 23

मतदान प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

देशभरातल्या मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा नवी दिल्लीत वार्ताहर परिषद घेऊन केला. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातल्या राजुरा आणि कर्नाटकातल्या आळंद विधानसभा मतदार संघातली उदाहरणं उपस्थितांच्या समोर मांडली.  बनावट अर्ज, काही सॉफ्टवेअर वापरुन मतदारांची नावं वगळणं, बोगस मतदार घुसवणं हे प्रकार झाल्याचा दावा त्यांनी केला.   राजुरा मतदारसंघात ६ हजार ८५० मतचोरी झाल्याप्रकरणी पोलिसांनी एफआयआरही दाखल केल्याचा दावा काँग्रेस प्रदे...

August 16, 2025 7:55 PM August 16, 2025 7:55 PM

views 4

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली बिहारमधे मतदान हक्क यात्रेला उद्यापासून सुरुवात

लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली बिहारमधल्या सासाराम इथून मतदान हक्क यात्रेला उद्यापासून सुरुवात होत आहे. १६ दिवस चालणारी ही यात्रा बिहारमधल्या २५ जिल्ह्यांमधून जाईल, अशी माहिती काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांनी दिली. यात राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीचे नेते सहभागी होतील.  मतदारयाद्यांच्या सखोल पुनरिक्षणात झालेल्या त्रुटी या यात्रेदरम्यान लोकांसमोर उघड केल्या जातील असं अखिलेश प्रसाद सिंह यांनी सांगितलं. 

July 14, 2025 2:44 PM July 14, 2025 2:44 PM

views 10

नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील गांधी कुटुंबाची पुढील सुनावणी २९ जुलैला होईल

नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अन्य आरोपींविरोधात सक्तवसुली संचालनालयानं  दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राची दखल घेण्याचा आदेश दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयानं आज राखून ठेवला.  या प्रकरणाची  पुढील सुनावणी २९ जुलैला होईल, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं.    नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रात काँग्रेस नेत्यांविरुद्ध मनी लाँड्रिंगचे आरोप झाले आहेत. या पुरवणी आरोपपत्रातले सर्व आरोप काँग्रेस नेत्यांनी फेटाळून लावले...

June 8, 2025 7:02 PM June 8, 2025 7:02 PM

views 140

राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तरं देत नसल्याचा काँग्रेसचा आरोप

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच्या राहुल गांधी यांच्या आरोपांवर निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तरं का देत नाही असा सवाल काँग्रेसने केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं, की राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोगाने उत्तरं दिली पाहिजेत परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासंदर्भात लेख लिहून जनतेची दिशाभूल केली आहे. राज्य विधानसभा निवडणुकीच्या वेळचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम आणि किरण कुलकर्णी यांची ...

June 8, 2025 4:37 PM June 8, 2025 4:37 PM

views 18

राहुल गांधींनी निवडणुक आयोगाशी संवाद साधावा, केंद्रीय निवडणूक आयोगाचं आवाहन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सार्वजनिक मंचावरून निवडणूक प्रक्रियेविषयी आरोप करण्याऐवजी निवडणूक आयोगाशी थेट संवाद साधावा असं आवाहन निवडणूक आयोगाने केलं असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता, त्यावर निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा हे आवाहन केलं. गांधी यांनी आपली तक्रार लिखित स्वरूपात द्यावी, तसंच प्रत्यक्ष येऊन भेटावं असं आयोगानं म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने काँग्रेसला १५ मे रोजी भेटीचं आमंत्रण दिलं होतं, मात्र त्यांनी ह...

June 7, 2025 8:00 PM June 7, 2025 8:00 PM

views 27

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या संदर्भात केलेले दावे निराधार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या संदर्भात केलेले दावे निराधार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. राज्याच्या मतदार यादीसंदर्भात त्यांनी केलेले आरोप कायद्याचा अवमान करणारे असल्याचंही निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. राहुल गांधी यांनी राज्यातल्या निवडणुकीच्या निकालासंदर्भात लिहिलेला लेख विविध वृत्तपत्रात आज प्रसिद्ध झाला आहे. त्यावर निवडणूक आयोगानं ही प्रतिक्रिया दिली आहे.    मतदारांकडून अपेक्षित कौल नाही मिळाला, म्हणून निवडणूक आयोग पक्षपाती असल्याचा...

May 24, 2025 7:53 PM May 24, 2025 7:53 PM

views 7

राहुल गांधी यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

झारखंडमधल्या चाईबासा इथल्या न्यायालयानं २०१८ मधील मानहानीच्या प्रकरणात लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. राहुल गांधी यांनी २६ जूनला कोर्टात स्वतः हजर राहावं असे निर्देश न्यायालयानं दिले आहे. २०१८ मध्ये आपल्या पक्षाच्या एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी भाजपाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या सुनावणीला वैयक्तिक उपस्थितीतून सूट मिळावी अशी विनंती राहुल गांधी यांच्या वकिलांनी क...

April 25, 2025 3:08 PM April 25, 2025 3:08 PM

views 13

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य न करण्याची न्यायालयाची राहुल गांधी यांना ताकीद

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल कुठलेही अवमानकारक वक्तव्य करु नका अशी ताकीद सर्वोच्च न्यायालयानं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान अकोल्यात झालेल्या सभेत त्यांनी सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.   त्यासंदर्भात न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि मनमोहन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. यापुढे स्वातंत्र्य सैनिकांबद्दल अशाप्रकारची वक्तव्य केली तर न्यायालय स्वतःहून कारवाई करेल, अशा इशाराही खंडपीठानं दिला. या...