काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सार्वजनिक मंचावरून निवडणूक प्रक्रियेविषयी आरोप करण्याऐवजी निवडणूक आयोगाशी थेट संवाद साधावा असं आवाहन निवडणूक आयोगाने केलं असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता, त्यावर निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा हे आवाहन केलं. गांधी यांनी आपली तक्रार लिखित स्वरूपात द्यावी, तसंच प्रत्यक्ष येऊन भेटावं असं आयोगानं म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने काँग्रेसला १५ मे रोजी भेटीचं आमंत्रण दिलं होतं, मात्र त्यांनी ही भेट टाळली. गांधींचे आरोप इतके गंभीर आहेत मात्र ते तक्रार लिखित स्वरुपात देण्याचं टाळत आहेत, हे आश्चर्यजनक आहे, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.
Site Admin | June 8, 2025 4:37 PM | Election Commission | Rahul Gandhi
राहुल गांधींनी निवडणुक आयोगाशी संवाद साधावा, केंद्रीय निवडणूक आयोगाचं आवाहन
