June 7, 2025 2:32 PM June 7, 2025 2:32 PM
12
भारता मधे तीव्र गरिबी निर्मुलनात लक्षणीय प्रगती
भारतानं तीव्र गरिबी निर्मुलनात लक्षणीय प्रगती केली असून, २०११-१२ ते २०२२-२३ या कालावधीत देशातले सुमारे २७ कोटी नागरिक तीव्र गरिबीतून बाहेर आल्याचं जागतिक बँकेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. देशाचा तीव्र गरिबीचा दर २०११-१२ मध्ये २७ पूर्णांक १ दशांश टक्के इतका होता. २०२२-२३ मध्ये तो ५ पूर्णांक ३ दशांश टक्क्यावर आल्याचं यात म्हटलं आहे. सुमारे १८५ रुपयांपेक्षा कमी दैनंदिन खर्च असलेल्या व्यक्ती जागतिक बँकेच्या व्याख्येसार तीव्र गरिबीच्या श्रेणीत येतात. महाराष्ट्र, उत्तर प्र...