March 8, 2025 9:03 PM
17
विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यात नारी शक्तीची सर्वात मोठी भूमिका असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यात नारी शक्तीची सर्वात मोठी भूमिका असणार आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. नवसारीतल्या वंसी-बोरसी इथं प्रधानमंत्री मोदी लखपती दीदी संमेलनाला संबोधित करताना बोलत होते. या कार्यक्रमात एक लाख महिला उपस्थित होत्या. नारी शक्तीने देशाच्या प्रगतीची कमान सांभाळली आहे. महिलांचा सन्मान ही समाज आणि देशाच्या विकासाची पहिली पायरी आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. माझ्या आयुष्यात मला कोट्यवधी माता-भगिनींचा आशीर्वाद मिळाला, हे माझं भाग्य आह...