July 2, 2025 3:06 PM July 2, 2025 3:06 PM

views 16

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ५ देशांच्या दौऱ्यावर रवाना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज घाना, त्रिनिदाद - टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील, नामिबिया या ५ देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. ते प्रथम घाना इथं जाणार असून उभयपक्षी हिताच्या अनेक मुद्द्यांवर बैठकांबरोबरच ते तिथल्या संसदेलाही संबोधित करणार आहेत. घानामधल्या भारतीय समुदायात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी उत्साहाचं वातावरण आहे. प्रधानमंत्री उद्या त्रिनिदाद टोबॅगो साठी रवाना होतील तिथे ते त्रिनिदादच्या राष्ट्रपती क्रिस्टिन कार्ला कांगालू आणि प्रधानमंत्री कमला प्रसाद बिसेसर यांची भेट घेतील. त...

June 28, 2025 8:19 PM June 28, 2025 8:19 PM

views 6

भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी संवाद साधला

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात असणारे भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्याशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला.  तू भारतापासून खूप दूर असलास तरी भारतीयांच्या जवळ, त्यांच्या हृदयात आहेस. तुझ्या प्रवासानं नव्या युगाचा शुभारंभ केला आहे, अशा शब्दात प्रधानमंत्री मोदी यांनी शुभांशु यांचं कौतुक केलं आणि त्यांना त्यांच्या मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या.    भारताचं प्रतिनिधीत्व करताना आपल्याला अभिमान वाटत असल्याची भावना शुभांशु यांनी व्यक्त केली. मी कधी अंतराळवीर होईन, असं मला वाटलं नव्हतं असं ...

June 28, 2025 2:04 PM June 28, 2025 2:04 PM

views 4

तरुणांना भारतीय परंपरांशी जोडण्यात महान जैन ऋषींचं मोलाचं योगदान-प्रधानमंत्री

तरुणांना भारतीय परंपरांशी जोडण्यात महान जैन ऋषींचे मोलाचं योगदान आहे, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं आचार्य विद्यानंद जी महाराजांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाचं उद्घाटन केल्यानंतर व्यक्त केलं. या प्रसंगी त्यांनी जैन मुनींच्या हस्त लिखीतांचं डीजीटायजेशन करण्याबद्दल माहिती दिली.    वेळी प्रधानमंत्र्यांनी आचार्याजींना आदरांजली अर्पण करण्यासाठी प्रत्येक भारतीय भारतीयांनी अवलंब करावा, अशा 9 संकल्पांविषयी आपलं मत व्यक्त केलं. यात ते म्हणाले की, प्रत्येक भारतीयांनी पाणी वाच...

June 24, 2025 6:03 PM June 24, 2025 6:03 PM

views 10

गेल्या काही वर्षांत भारताच्या अन्नप्रक्रिया क्षेत्रात उल्लेखनीय बदल झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

गेल्या काही वर्षांत भारताच्या अन्नप्रक्रिया क्षेत्रात उल्लेखनीय बदल झाले असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ग्रामीण उद्योजकांना सक्षम बनवण्यासाठी या क्षेत्राची महत्त्वाची भूमिका असल्याचं त्यांनी सांंगितलं. एका वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या लेखावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा लेख अन्न प्रक्रिया क्षेत्रात भारताचं उल्लेखनीय यश याविषयीचा आहे. 

June 24, 2025 5:50 PM June 24, 2025 5:50 PM

views 4

ऑपरेशन सिंदूरमुळे भारताचं दहशतवादाविरोधातलं ठाम धोरण स्पष्ट झालं-प्रधानमंत्री

ऑपरेशन सिंदूरमुळे भारताचं दहशतवादाविरोधातलं ठाम धोरण स्पष्ट झालं, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.  ते आज नवी दिल्ली इथं केरळमधील समाजसुधारक श्री नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांच्यातल्या ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभात बोलत होते. दहशतवाद्यांची आश्रयस्थानं आता सुरक्षित नाहीत, असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.  आजच्या भारतात केवळ राष्ट्रहिताचे निर्णय घेतले जातात तसंच भारताचं इतर देशांवरचं लष्करी अवलंबित्व कमी होत आहे, देश संरक्षणदृष्ट्या स्वावलंबी होत आहे,  हे प्रधानमं...

June 2, 2025 7:15 PM June 2, 2025 7:15 PM

views 9

जागतिक हवाई वाहतूक उद्योगात भारताचं महत्त्व वाढलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

जागतिक हवाई वाहतूक उद्योगात भारताचं महत्त्व वाढलं आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे IATA अर्थात आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या ८१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते आज बोलत होते. जागतिक हवाई वाहतूक उद्योगात भारत एक आघाडीची शक्ती म्हणून उदयाला येत आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. ‘उडान’ योजना ही भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रातलं सुवर्णपान असून देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्रात भारताने जगात तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतल्याचं त्यांनी सांगितलं. &nbs...

June 2, 2025 3:05 PM June 2, 2025 3:05 PM

views 5

प्रधानमंत्री आणि पॅराग्वेचे अध्यक्ष सँटियागो यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पॅराग्वेचे अध्यक्ष सॅंटियागो पेना पॅलासिओस यांच्यात नवी दिल्ली येथे शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण क्षेत्रांचा आढावा घेतला. दोन्ही देशांमध्ये डिजिटल तंत्रज्ञान, शेती, संरक्षण, रेल्वे, अंतराळ यासह इतर क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध असून दहशतवादाविरुद्धच्या लढाईत दोन्ही देश एकसाथ असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले.    पॅलासिओस हे आज सकाळी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत पोहोचले. परराष्ट्...

June 1, 2025 6:39 PM June 1, 2025 6:39 PM

views 9

प्रधानमंत्री आणि आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मसातो कांडा यांची भेट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मसातो कांडा यांची नवी दिल्ली इथे भेट घेतली. या भेटीविषयी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये प्रधानमंत्री म्हणाले की, गेल्या दशकात भारताच्या जलद परिवर्तनामुळे असंख्य लोक सक्षम झाले असून या प्रगतीचा वेग वाढवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत, असं मोदी म्हणाले.   या बैठकीदरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्या. पुढच्या पाच वर्षांत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी, मेट्रो सेवेचं जाळं विस्तारण्यासाठी, शहरातल्या सुविधांचं आधुनिकीकरण करण्या...

May 28, 2025 2:33 PM May 28, 2025 2:33 PM

views 11

प्रधानमंत्री उद्यापासून सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सिक्कीम दौऱ्यादरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी “सिक्कीम@५०: या कार्यक्रमात सहभागी होतील. तसंच राज्यातल्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही करतील. त्यानंतर पश्चिम बंगालमधल्या अलीपुरद्वार आणि कूचबिहार जिल्ह्यांमध्ये शहर गॅस वितरण प्रकल्पाची पायाभरणी प्रधानमंत्री मोदी करणार आहेत. तसंच बिहारमध्ये पाटणा विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटन, करकट इथं ४८ हजार ५...

May 26, 2025 8:13 PM May 26, 2025 8:13 PM

views 11

देशाच्या विकासासाठी आवश्यक प्रत्येक गोष्ट देशातच तयार व्हावी, ही काळाची गरज-प्रधानमंत्री

देशाच्या विकासासाठी आवश्यक सर्व गोष्टी देशातच तयार व्हाव्यात, ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी २०१४ मध्ये भारताचे प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतल्याला आज ११ वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त गुजरातमधे दाहोद इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रेल्वे इंजिन प्रकल्पासह, सुमारे २४ हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण मोदी यांच्या हस्ते झालं. देशातलं औद्योगिक उत्पादन आणि निर्यातही सातत्यानं वाढत असल्याचं त्यांनी सांगितल...