September 27, 2025 3:16 PM September 27, 2025 3:16 PM
17
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ओदिशात झारसुगडा इथं स्वदेशी तंत्रज्ञानाच्या मोबाईल 4G टॉवर्सचं उद्घाटन
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओदिशाच्या दौऱ्यावर आहेत. झारसुगुडा इथं आयोजित कार्यक्रमात साठ हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांनी केली. दूरसंचार, रेल्वे, उच्च शिक्षण, आरोग्यसेवा, कौशल्य विकास, ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्र अशा विविध क्षेत्रांतल्या प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. गरीबांना हक्काचं पक्कं घर मिळवून देण्यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी भाषणात सांगितलं. दूरसंचार क्षेत्रात, स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आणि सुम...