July 4, 2025 9:52 AM July 4, 2025 9:52 AM

views 17

घानाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं प्रधानमंत्र्यांचा गौरव

घानाची लोकशाहीवृत्ती, प्रतिष्ठा आणि स्थिरता यासाठी दृढ वचनबद्धता या गुणाचं त्यांनी कौतुक केलं. आफ्रिकन खंडासाठी हा देश प्रेरणास्थान असल्याचा गौरव योवेळी बोलताना मोदींनी केला. घानाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ स्टार देऊन मोदींचा गौरव करण्यात आला. पंतप्रधान मोदी या दौऱ्याच्या पुढील टप्प्यात, अर्जेंटिनाला भेट देणार आहेत. गेल्या 57 वर्षांत भारतीय पंतप्रधानांचा अर्जेंटिनाचा हा पहिला दौरा असेल.  

April 1, 2025 1:20 PM April 1, 2025 1:20 PM

views 14

चिलीचे अध्यक्ष गॅब्रीएल बोरिक फॉन्ट यांनी आज प्रधानमंत्री मोदी यांची नवी दिल्लीत घेतली भेट

चिलीचे अध्यक्ष गॅब्रीएल बोरिक फॉन्ट यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. अध्यक्ष बोरिक त्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासह आजपासून भारताच्या ५ दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. ही त्यांची पहिलीच भारत भेट आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर यांनी आज सकाळी त्यांची नवी दिल्ली इथं भेट घेऊन भारत चिली सहकार्याला बळकट करण्यासाठी त्यांच्या वचनबद्धतेबद्दल आनंद व्यक्त केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सायंकाळी आयोजित केलेल्या भोजनसमारंभात अध्यक्ष बोरिक उपस्थित राहतील. पुढील दिवसांच्य...

January 7, 2025 3:03 PM January 7, 2025 3:03 PM

views 8

मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी घेतली प्रधानमंत्री मोदी यांची भेट

मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मायक्रोसॉफ्ट भारतात करणार असलेल्या गुंतवणुकीबाबत आणि विस्ताराबाबत प्रधानामंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. नाडेला यांच्याबरोबर तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आदी विषयांवर चर्चा झाल्याचं त्यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.  

January 4, 2025 2:46 PM January 4, 2025 2:46 PM

views 5

पंतप्रधान मोदी यांनी बुद्धिबळपटू कोनेरू हंपी आणि तिच्या कुटुंबीयांची नवी दिल्लीत घेतली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बुद्धिबळपटू कोनेरू हंपी आणि तिच्या कुटुंबीयांची नवी दिल्लीत भेट घेतली. कोनेरू ही क्रीडा क्षेत्रातलं प्रेरणादायी व्यक्तिमत्व असून, उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा देत आली असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. खळेमधली तिची विद्वत्ता आणि आणि निष्ठा ठळकपणे दिसते अशा शब्दांत प्रधानमंत्र्यांनी कोनेरु हंपी हिची प्रशंसा केली आहे.

December 15, 2024 9:32 AM December 15, 2024 9:32 AM

views 5

आपल्या कार्यकाळातल्या घटना दुरुस्त्या समाजातल्या वंचिताच्या हितासाठी – पंतप्रधान

आपल्या कार्यकाळातल्या घटना दुरुस्त्या समाजातल्या वंचिताच्या हितासाठी केल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राज्यघटना स्वीकृतीच्या अमृत महोत्सवानिमित्त लोकसभेत संविधानावर झालेल्या विशेष चर्चेच्या उत्तरात ते काल बोलत होते. काँग्रेसने संविधानाचा सातत्याने अवमान केला, तसंच राजकीय स्वार्थासाठी संविधानाचा वापर केल्याचं नमूद करत, काँग्रेसच्या कार्यकाळात ६५ वेळा घटना दुरुस्ती करण्यात आल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. आणिबाणीसह अनेक घटनांचा त्यांनी यावेळेस उल्लेख केला. आपल्या कार्यकाळात म...

October 1, 2024 11:09 AM October 1, 2024 11:09 AM

views 10

पश्चिम आशियातील घडामोडींसंदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इस्राईलच्या प्रधानमंत्र्यांशी चर्चा

पश्चिम आशियातील अलीकडच्या काळातील घडामोडींविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इस्राईलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याशी काल चर्चा केली. दहशतवादाला जगात कुठेही थारा नसल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पश्चिम आशियातील तणाव निवळणं आवश्यक आहे; ओलिस ठेवलेल्यांची सुरक्षित सुटका करणंही महत्त्वाचं असून, या क्षेत्रात लवकरात लवकर शांतता आणि स्थिरता प्रस्थापित व्हावी यासाठी भारताचा कायमच पाठिंबा असेल असंही पंतप्रधानांनी नमूद केलं.

June 29, 2024 3:42 PM June 29, 2024 3:42 PM

views 10

पंतप्रधान आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा पहिला भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. समाजमाध्यमांवरही हा कार्यक्रम ऐकता येईल.  

June 14, 2024 7:45 PM June 14, 2024 7:45 PM

views 19

प्रधानमंत्र्यांची इटलीमधे विविध राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा संपन्न

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीमधे अपुलिया इथं आज विविध राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा केली. जी सेव्हन देशांच्या शिखर परिषदेसाठी मोदी सध्या इटलीत आहेत. आज दुपारी त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, अंतराळ, शिक्षण, हवामान बदल, पायाभूत सुविधा, उर्जा, क्रीडा इत्यदी क्षेत्रातल्या परस्पर सहकार्याविषयी त्यांची बातचीत झाली. जागतिक आणि क्षेत्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवरही उभय नेत्यांमधे विचारांची देवाण घेवाण झाली. पुढच्या वर्षी फ्रान्समधे होणाऱ्या क...