घानाची लोकशाहीवृत्ती, प्रतिष्ठा आणि स्थिरता यासाठी दृढ वचनबद्धता या गुणाचं त्यांनी कौतुक केलं. आफ्रिकन खंडासाठी हा देश प्रेरणास्थान असल्याचा गौरव योवेळी बोलताना मोदींनी केला. घानाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ स्टार देऊन मोदींचा गौरव करण्यात आला. पंतप्रधान मोदी या दौऱ्याच्या पुढील टप्प्यात, अर्जेंटिनाला भेट देणार आहेत. गेल्या 57 वर्षांत भारतीय पंतप्रधानांचा अर्जेंटिनाचा हा पहिला दौरा असेल.