November 7, 2025 2:28 PM November 7, 2025 2:28 PM
45
स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या वंदे मातरम् या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या वंदे मातरम् या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाची आज सुरुवात झाली. हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी दीडशे वर्षांपूर्वी लिहिलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं ‘वंदे मातरम्’ शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाचं उद्घाटन केलं. ‘वंदे मातरम्’ हा एक मंत्र आहे, एक ऊर्जा आहे, एक स्वप्न आणि एक संकल्प आहे, असं प्रधानमंत्र्यांनी या कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितलं. हे गीत म्हणजे भारतमातेप्रति भक्ती आणि आदर व्यक्त करणारा भाव आहे, जो आपल्याला इतिहासाशी जो...