June 27, 2025 3:54 PM June 27, 2025 3:54 PM

views 13

देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग परिसंस्था मजबूत असणं आवश्यक असल्याचं, राष्ट्रपतींचं प्रतिपादन

देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी मजबूत MSME अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग परिसंस्था आवश्यक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आंतरराष्ट्रीय MSME दिनाच्या कार्यक्रमाला त्या संबोधित करत होत्या. MSME क्षेत्र देशाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं त्या म्हणाल्या. MSME क्षेत्र ग्रामीण आणि मागासलेल्या भागात रोजगाराच्या संधी निर्माण करत असल्याचं त्यांनी म्हटलं. MSME क्षेत्र हे शेतीनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचं रोजगार निर्माण करणारं क्षेत्र असल्याचं ...

May 29, 2025 12:17 PM May 29, 2025 12:17 PM

views 12

राष्ट्रपती भवनात आयोजित साहित्य संमेलनाचं राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन होणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनातल्या सांस्कृतिक केंद्रात आयोजित  साहित्य संमेलनाचं उद्घाटन करतील. साहित्य अकादमीच्या सहयोगानं आयोजित केलेल्या या दोन दिवसीय कार्यक्रमात कवी संमेलन, भारतातलं  स्त्रीवादी साहित्य, साहित्यातले बदलते प्रवाह विरुद्ध बदल परिभाषित करणारं साहित्य, जागतिक दृष्टिकोनातून भारतीय साहित्याच्या नव्या दिशा, या आणि इतर विषयांवर सत्र आयोजित केली जातील. देवी अहिल्याबाई होळकर यांची गाथा सादर करून  या कार्यक्रमाची सांगता होईल. 

May 27, 2025 1:33 PM May 27, 2025 1:33 PM

views 17

राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं विविध मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करणार आहेत. या वर्षी सरकारनं १३९ पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून त्यामध्ये ७ पद्म विभूषण, १९ पद्म भूषण आणि ११३ पद्मश्रींचा समावेश आहे. पहिल्या समारंभात राष्ट्रपतींनी ७१ पद्म सन्मान प्रदान केले. आजच्या कार्यक्रमात ६८ मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करण्यात येतील. 

April 29, 2025 9:33 AM April 29, 2025 9:33 AM

views 7

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मान्यवरांचा पद्म पुरस्कारानं गौरव

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल राष्ट्रपती भवन इथं आयोजित करण्यात आलेल्या समारंभात पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर आणि गझल गायक पंकज उधास यांना ‘पद्मभूषण सन्मान’ प्रदान करण्यात आला.   पंकज उधास यांच्या पत्नीने हा सन्मान स्विकारला. मारोती चीतमपल्ली यांना वन्यजीव अभ्यासक,साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील तर चैत्राम पवार यांना पर्यावरण ,वनसंवर्धन, आणि सामाजिक क्षेत्रातील कामासाठी पद्मश्री सन्मान देण्यात आला.   अरुंधती भट्टाचार्य, पवनकुम...

April 13, 2025 6:25 PM April 13, 2025 6:25 PM

views 8

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींच्या शुभेच्छा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिवादन केलं असून, देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. बाबासाहेबांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून देदीप्यमान कामगिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अलौकिक क्षमतांनी उजळून निघालेलं त्यांचं जीवन कार्य प्रेरणादायी आहे, असं राष्ट्रपतींनी शुभसंदेशात म्हटलं आहे. 

April 6, 2025 12:54 PM April 6, 2025 12:54 PM

views 10

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पोर्तुगाल आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पोर्तुगाल आणि स्लोव्हाकियाच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. आज रात्री उशिरा त्या पोर्तुगालला पोहोचतील. आपल्या पोर्तुगाल दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू पोर्तुलागच्या राष्ट्रपती मार्सेलो रेबेलो डी सौसा यांची भेट घेऊन शिष्टमंडळ स्तरीय चर्चा करतील. त्या पोर्तुगालचे प्रधानमंत्री लुईस मॉन्टेनेग्रो आणि त्यांच्या राष्ट्रीय संसदेचे अध्यक्ष जोस पेड्रो अगुइर-ब्रँको यांचीही भेट घेणार आहेत. पोर्तुगालचा दौरा आटोपून स्लोव्हाकियाला पोहोचल्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, स्लोव्हाकीयाचे रा...

March 11, 2025 7:37 PM March 11, 2025 7:37 PM

views 15

कृषी आणि पर्यावरणतज्ञांशी सल्लामसलत करून संशोधन करण्याचं राष्ट्रपतींचं डॉक्टरांना आवाहन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉक्टरांना निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याविषयी जागरूकता वाढविण्यासाठी कृषी आणि पर्यावरण तज्ञांशी सल्लामसलत करून संशोधन करण्याचं आवाहन केलं. त्या पंजाबमधे बठिंडा इथं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला त्या संबोधित करत होत्या. अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक हानीबाबत लोकांना जागरूक केलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आध्यात्मिक आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्यानं निरोगी जीवनशैलीबाबत जनजागृती मोहीम राबवण्याचा सल्ला त...

March 10, 2025 10:54 AM March 10, 2025 10:54 AM

views 21

राष्ट्रपती हरियाणा, चंदीगड आणि पंजाबच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून हरियाणा, चंदीगड आणि पंजाबच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी, राष्ट्रपती हिसार इथं गुरु जंभेश्वर विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. तसंच ब्रह्माकुमारींच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यानिमित्त 'समग्र कल्याणासाठी आध्यात्मिक शिक्षण' या राज्यस्तरीय मोहिमेचा शुभारंभ करतील.   उद्या, राष्ट्रपती पंजाब केंद्रीय विद्यापीठ आणि भटिंडा इथल्या एम्सच्या दीक्षांत समारंभ, मोहाली इथं पंजाब सरकारने आयोजित...

February 28, 2025 1:44 PM February 28, 2025 1:44 PM

views 16

न्यायाधारित विकसित भारत घडवण्यासाठी न्यायवैद्यक शास्त्राची महत्त्वाची भूमिका – राष्ट्रपती

न्यायाधारित विकसित भारत घडवण्यासाठी न्यायवैद्यक शास्त्राची महत्त्वाची भूमिका असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. गुजरातमध्ये गांधीनगर इथे राष्ट्रीय न्यायवैद्यक विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षांत समारंभाला त्या संबोधित करत होत्या. यावेळी त्यांनी सर्वांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून विकसित भारताच्या संकल्पनेला अधोरेखित केलं.    गुन्ह्यांच्या बदलत्या स्वरुपाच्या पार्श्वभूमीवर न्यायवैद्यक शास्त्राचं महत्त्वं वाढत असल्याचंही त्या म्हणाल्या. न्यायवैद्यकीय तज्ञांना प...

February 27, 2025 1:34 PM February 27, 2025 1:34 PM

views 17

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्टॅच्यू ऑफ युनिटीला दिली भेट

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी राष्ट्रपतींनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देऊन सरदार वल्लभभाई पटेल यांना पुष्पांजली अर्पण केली. त्यानंतर राष्ट्रपतींनी एकता नगर इथं जंगल सफारीचा आनंद घेतला.  एकता कौशल्य विकास केंद्राला राष्ट्रपती भेट देणार असून तिथल्या प्रशिक्षणार्थींशी त्या संवाद साधणार आहेत. त्यानंतर अहमदाबाद इथल्या राष्ट्रीय डिझाईन संस्थेच्या ४४ व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहतील.