राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनातल्या सांस्कृतिक केंद्रात आयोजित साहित्य संमेलनाचं उद्घाटन करतील. साहित्य अकादमीच्या सहयोगानं आयोजित केलेल्या या दोन दिवसीय कार्यक्रमात कवी संमेलन, भारतातलं स्त्रीवादी साहित्य, साहित्यातले बदलते प्रवाह विरुद्ध बदल परिभाषित करणारं साहित्य, जागतिक दृष्टिकोनातून भारतीय साहित्याच्या नव्या दिशा, या आणि इतर विषयांवर सत्र आयोजित केली जातील. देवी अहिल्याबाई होळकर यांची गाथा सादर करून या कार्यक्रमाची सांगता होईल.
Site Admin | May 29, 2025 12:17 PM | President Droupadi Murmu
राष्ट्रपती भवनात आयोजित साहित्य संमेलनाचं राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन होणार
