June 2, 2025 8:14 PM June 2, 2025 8:14 PM

views 30

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पॅराग्वेचे अध्यक्ष सँटियागो पेना पॅलासिओस यांच्यात नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय बैठक, संयुक्त आयोगाच्या स्थापनेसाठी उभय देशांमधे सामंजस्य करार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पॅराग्वेचे अध्यक्ष सँटियागो पेना पॅलासिओस यांच्यात आज नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत व्यापार, संरक्षण, आरोग्य, रेल्वे, अंतराळ, कृषी, स्वच्छ ऊर्जा, हायड्रोजन आणि जैव इंधन या क्षेत्रांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली. भारत आणि पॅराग्वे यांनी संयुंक्त राष्ट्रांसह विविध बहुपक्षीय संघटनांमध्ये समान हिताच्या मुद्द्यांवर काम करण्याची तयारी दर्शवली आहे. दोन्ही देश डिजिटलीकरण आणि माहितीआधारीत संवाद तंत्रज्ञान वाढवण्यावर काम करत आहेत.   यावेळी भारत आणि पॅराग्वे ...

April 26, 2025 1:16 PM April 26, 2025 1:16 PM

views 7

प्रधानमंत्री ‘मन-की-बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून रविवारी नागरिकांशी साधणार संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणी वर ‘मन-की-बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून देश-विदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सादर होणाऱ्या या कार्यक्रमाचा हा १२१ वा भाग असेल.   नागरिकांनी त्यांचे विचार आणि सूचना १८००-११-७८०० या टोल फ्री क्रमांकाद्वारे पाठवाव्यात, असं आवाहन करण्यात आलं आहे. आकाशवाणी, दूरदर्शन, तसंच प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब चॅनल वरून मन-की-बात या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होणार असून त्यानंतर लगेचच विविध प्रादेशिक भाषांमधून या ...

April 4, 2025 7:41 PM April 4, 2025 7:41 PM

views 14

जगाच्या कल्याणासाठी बिम्सटेक हे उपयुक्त व्यासपीठ – प्रधानमंत्री

जगाच्या कल्याणासाठी बिम्सटेक हे उपयुक्त व्यासपीठ असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बँकॉक इथं सहाव्या बिम्सटेक संमेलनात आज ते बोलत होते. बिम्सटेक ही दक्षिण आणि आग्नेय आशियाई देशांची संघटना असून सदस्य देशांमधे सहकार्यासाठी २१ कलमी कार्यक्रम प्रधानमंत्र्यांनी प्रस्तावित केला.    बिम्सटेक चेंबर ऑफ कॉमर्सच्या स्थापनेची घोषणा करुन त्यांनी सांगितलं की त्याची व्यावसायिक बैठक दरवर्षी होईल. आपत्ती व्यवस्थापन, शाश्वत सागरी वाहतूक, पारंपरिक औषधं आणि कृषी संशोधन आणि प्रशिक्षण या विषया...

April 3, 2025 9:30 AM April 3, 2025 9:30 AM

views 7

दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी प्रधानमंत्री थायलंडला रवाना

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज सकाळी थायलंडला रवाना झाले. सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत प्रधानमंत्री सहभागी होणार आहेत. 2016 आणि 2019 नंतरचा पंतप्रधानांचा हा तिसरा दौरा आहे. ते आज संध्याकाळी थायलंडचे प्रधानमंत्री पेटोंगटार्न शिनावात्रा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील.   या प्रसंगी अनेक द्विपक्षीय करारांवर सह्याही केल्या जाणार आहेत. बिमस्टेक परिषद उद्या होणार असून, बिमस्टेक – संपन्न, लवचिक आणि खुली असं या परिषदेचं ब्रीदवाक्य आहे. या परिषदेनंतर प्रधानमंत्री मोदी उद्या श्...

April 2, 2025 3:41 PM April 2, 2025 3:41 PM

views 21

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे देशाचं बौद्धिक पुनर्जागरण- प्रधानमंत्री

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे देशाचं बौद्धिक पुनर्जागरण आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एका दैनिकात लिहिलेला लेख प्रधानमंत्र्यांनी सामायिक  करताना हे वक्तव्य केलं.   नवं शैक्षणिक धोरण शिक्षण आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून आत्मनिर्भर आणि जागतिक स्तरावर प्रतिस्पर्धा करु शकणारं राष्ट्र घडवण्याचा मार्ग प्रशस्त बनवत आहे, असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.

March 28, 2025 1:39 PM March 28, 2025 1:39 PM

views 2

प्रधानमंत्री येत्या ३ एप्रिलपासून थायलंडच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या ३ एप्रिलपासून थायलंडच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. थायलंडची राजधानी बँकॉक इथे सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत ते सहभागी होती. थायलंडचे प्रधानमंत्री पेतोंगटार्न शिनावात्रा यांनी मोदी यांना या दौऱ्यासाठी निमंत्रित केलं आहे. प्रधानमंत्र्यांचा तिसरा थायलंड दौरा असेल.   या दौऱ्यात ते बिमस्टेक नेत्यांशी सहकार्य वाढवण्यासाठी चर्चा करणार आहेत. या भेटीनंतर मोदी हे श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराकुमारा दिसानायके यांच्या निमंत्रणावरून श्रीलंकेच्या तीन दिवसांच्या दौ...

March 22, 2025 1:33 PM March 22, 2025 1:33 PM

views 23

बिहारच्या स्थापना दिनानिमित्त बिहारवासीयांना प्रधानमंत्र्यांकडून शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या स्थापना दिनानिमित्त बिहारवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. बिहार ही प्राचीन काळापासून ज्ञान आणि विकासाची भूमी असल्याचं राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. बिहारचे नागरिक त्यांची प्रतिभा, निश्चय आणि कष्ट यातून विकसित बिहारसाठी आणि पर्यायाने समृद्ध भारतासाठी भरीव योगदान देत राहतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बिहारचं वर्णन दिग्गज व्यक्तिमत्त्वांची पवित्र भूमी असं केलं आ...

March 1, 2025 1:16 PM March 1, 2025 1:16 PM

views 30

२१ व्या शतकातील भारताकडे जग आशेनं पाहत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

२१ व्या शतकातील भारताकडे जग आशेनं पाहत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं NXT परिषदेत बोलत होते. जगभरातील लोक भारताला जाणून घेण्यासाठी इथं येत आहेत, असं प्रधानमंत्री म्हणाले. नुकत्याच झालेल्या महाकुंभ मेळ्याच्या व्यवस्थापनाचं प्रधानमंत्र्यांनी कौतुक केलं.   तिथल्या व्यवस्थापनाबद्दल जगाला भारताचं आश्चर्य वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. योगा आणि आयुष उत्पादनं जागतिक पातळीवर पोहोचल्याबद्दल त्यांनी कौतुकोद्गार काढले. भारतात मोठ्या प्रमाणात ...

February 14, 2025 3:14 PM February 14, 2025 3:14 PM

views 11

अमेरिकेचा दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी परतले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला दोन दिवसांचा अमेरिका दौरा आटपून आज मायदेशी परत यायला निघाले. याआधी ते फ्रान्सच्या तीन  दिवसांच्या दौऱ्यावर होते. आपल्या अमेरिकेच्या दौऱ्यात त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासह तिथल्या अनेक वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. ट्रम्प यांनी जानेवारी महिन्यात दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर  भारताबरोबरची ही पहिलीच द्विपक्षीय चर्चा होती.     प्रधानमंत्री मोदी यांच्या अमेरिका भेटीत दोन्ही देशांमध्ये व्यापार, उद्योग, संरक्षण आणि सुरक्षा, ऊर्जा, ...

February 14, 2025 1:31 PM February 14, 2025 1:31 PM

views 14

पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना प्रधानमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

२०१९ च्या पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावर आदरांजली वाहिली. या जवानांचं बलिदान आणि देशाप्रति असलेलं त्यांचं समर्पण येणाऱ्या पिढ्या कधीच विसरणार नाहीत, असं प्रधानमंत्री म्हणाले. २०१९ ला आजच्या दिवशी जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा  इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले होते.        केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही समाजमाध्यमावर पुलवामा हल्ल्यातल्या शाहिद जवानांना आदरांजली वाहिली. दहशतवाद्यांविर...