July 3, 2024 9:42 AM

views 28

देशातल्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी दोषींना शिक्षा होईल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

देशातल्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी सरकार गंभीर असून दोषींना शिक्षा होईल अशी ग्वाही काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत दिली. यासाठी युद्धपातळीवर पावले उचलली जात असल्याचं ते म्हणाले. दोन्ही सदनाच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभाराच्या प्रस्तावाला उत्तर देताना ते बोलत होते. नीट परीक्षेसंदर्भात देशभरातून संशयितांना ताब्यात घेतलं असून, ही प्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यसाठी पावलं उचलली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. अशा धोक्याच्या प्रसंगांचा सामना करण्यासाठी सरकारने यापु...

July 3, 2024 9:37 AM

views 29

काँग्रेसकडून घटना, आरक्षण मुद्द्यांवर चुकीच्या माहितीद्वारे देशवासियांची दिशाभूल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

लोकसभेच्या दोन्ही सदनाच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाला उत्तर देताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. अग्निवीर आणि किमान आधारभूत किंमत या मुद्द्यांवर ते सभागृहाची दिशाभूल करत असल्याचं प्रधानमंत्री यांनी नमूद केलं. राहुल गांधी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामीनावर बाहेर आले असून, इतर मागासवर्गीय समाजाचा अपमान केल्याप्रकरणी दोषी आढळले असल्याचं सांगून, काँग्रेस नेत्यावर अनेक बदनामीचे खटले सुरू असल्याचं मोदी म्हणाले.   ल...

July 2, 2024 6:50 PM

views 36

देश सर्वप्रथम या तत्त्वावरच आपलं सरकार काम करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं लोकसभेत प्रतिपादन

देश सर्वप्रथम या तत्त्वावरच आपलं सरकार काम करत असून भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या आपल्या लढ्यामुळंच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने सलग तिसऱ्यांदा आपल्यावर विश्वास व्यक्त केला आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते.  गेल्या १० वर्षातल्या रालोआ सरकारच्या कामगिरीचा आढावा घेत मोदी यांनी सांगितलं, देशाची अखंडता आणि एकात्मता यांच्या सुरक्षिततेसाठी भारत कोणत्याही थराला जाऊ ...

July 2, 2024 2:53 PM

views 30

संसद सभागृहात सदस्यांनी लोकशाही तत्त्वांचं पालन करण्याचं प्रधानमंत्री मोदी यांचं आवाहन

संसद सभागृहात लोकशाही तत्त्वांचं आणि नियमांचं पालन काटेकोरपणे करावं असं आवाहन प्रधानमंत्री मोदी यांनी या बैठकीत केलं, असं रिजिजू म्हणाले. संसदेतले लोकनियुक्त प्रतिनिधी कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांच्यावर देशसेवेची जबाबदारी असते, यावर प्रधानमंत्र्यांनी बैठकीत भर दिला. पर्यावरण, पाणी, आणि इतर सामाजिक महत्त्वाच्या लोकहिताच्या विषयात लोकप्रतिनिधींनी अभ्यास करुन ज्ञान संपादन करावं असंही आवाहन त्यांनी केलं. दिल्लीतल्या प्रधानमंत्री संग्रहालयाला प्रत्येक खासदाराने किमान एकदा सहकुटुंब भेट द्यावी असंह...

June 30, 2024 7:53 PM

views 24

माजी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या चरित्रासह दोन पुस्तकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

माजी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या चरित्रासह दोन पुस्तकांचं प्रकाशन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. नायडू यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त दूरचित्रसंवाद माध्यमातून मोदी यांनी पुस्तकांचं प्रकाशन केलं. या पुस्तकांमुळे त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचेल आणि अनेकांना देशकार्य करण्यासाठी प्रेरणा मिळेल, असं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं.

June 25, 2024 1:47 PM

views 42

राजकीय आणीबाणीचा विरोध करणाऱ्या सर्वांना प्रधानमंत्र्यांकडून आदरांजली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १९७५ मध्ये देशात लागू करण्यात आलेल्या राजकीय आणीबाणीचा विरोध करणाऱ्या सर्व स्त्री - पुरुषांना आदरांजली वाहिली आहे. सर्व भारतीयांना सन्मानिय असणाऱ्या संविधानाला अपमानित करत काँग्रेसनं जनतेच्या मुलभूत स्वातंत्र्याचं हनन केलं होतं, याची आठवण करून देणारा हा दिवस असल्याचं, प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.

June 24, 2024 5:13 PM

views 28

देशवासियांच्या जीवनमानात सुधारणा घडवण्यासाठी सरकार वचनबद्ध – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

एकशे चाळीस कोटी भारतीयांचं जीवनमान सुधारणं हीच रालोआ सरकारच्या लेखी खरी सुधारणा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात केलं आहे. वस्तू आणि सेवा कर प्रणालीची अंमलबजावणी केल्यापासून अनेक गृहोपयोगी वस्तू स्वस्त झाल्या असून सामान्य माणसाच्या बचतीत भर पडली आहे. देशवासियांच्या जीवनमानात सुधारणा घडवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं ते म्हणाले. 

June 20, 2024 2:42 PM

views 27

सिकलसेल आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार वचनबद्ध

सिकलसेल आजाराशी संबंधित आव्हानांना तोंड देण्यासाठी केंद्र सरकार तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करत असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आजच्या जागतिक सिकल सेल दिवसाच्या निमित्तानं समाजमाध्यमावरून दिलेल्या संदेशात या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार वचनबद्द असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे. या आजाराचं निदान आणि त्यावरील उपचार अशा विविध पैलूंवर सरकार काम करत असल्याचंही त्यांनी संदेशात म्हटलं आहे.   दरम्यान, या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याचं लवकर निदान करणं, उप...