July 14, 2024 3:03 PM

views 28

गेल्या काही वर्षांत ८ कोटी नवीन रोजगारनिर्मिती झाल्याने बेरोजगारीबद्दलच्या अफवा पसरवणाऱ्यांना उत्तर मिळालं – प्रधानमंत्री

गेल्या तीन ते चार वर्षांत आठ कोटी नवीन रोजगारनिर्मिती झाली असून त्यामुळे देशात बेरोजगारीबद्दलच्या अफवा पसरवणाऱ्यांना उत्तर मिळालं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल झालेल्या जाहीर कार्यक्रमात या संदर्भातली आकडेवारी आणि आरबीआयच्या अहवालाचा हवाला देत, देशात कौशल्य विकास आणि रोजगाराची गरज आहे आणि सरकार या दिशेने काम करत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.   अफवा पसरवणारे गुंतवणुकीचे, पायाभूत सुविधांच्या विकासाचे आणि देशाच्या विकासाचे शत्रू आहेत, असं मोदी म्हणाले. महाराष्...

July 14, 2024 7:25 PM

views 31

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ड्रंप यांच्यावर निवडणूक प्रचारसभेत हल्ला

  अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. प्रधानमंत्र्यांनी या घटनेचा निषेध केला असून राजकारणात आणि लोकशाहीत हिंसेला कोणतंही स्थान नाही असं समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. ट्रंप यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या हल्ल्यातल्या मृतांचे कुटुंबीय, जखमी व्यक्ती आणि अमेरिकी नागरिकांच्या दुःखात भारत सहभागी आहे, असंही त्यांनी सांगितलं.    अमेर...

July 14, 2024 12:19 PM

views 28

नागरिकाभिमुख उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसारमाध्यमांनी सरकारला पाठिंबा दिला पाहिजे – प्रधानमंत्री

नागरिकाभिमुख उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसारमाध्यमांनी सरकारला पाठिंबा दिला पाहिजे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जागतिक स्तरावर प्रशंसा झालेल्या ‘एक पेड माँ के नाम’ या पर्यावरण संवर्धन उपक्रमाचं उदाहरण देऊन या उपक्रमाला प्रसारमाध्यमं लोक चळवळ बनविण्यात मदत करू शकतात असं पंतप्रधानांनी सांगितलं.   ‘विकसीत भारत’च्या आगामी २५ वर्षांच्या प्रवासात वर्तमानपत्रं आणि मासिकांची महत्वाची भूमिका असल्याचं नमूद करत लोकांना त्यांच्या ताकदीची जाणीव करून देत असल्याबद्दल त्यांनी प्र...

July 11, 2024 7:38 PM

views 33

प्रधानमंत्र्यांचे हस्ते १३ जुलैला गोरेगाव-मुलुंड मार्गातील बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन

गोरेगाव मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यातल्या जुळा बोगदा कामाचं भूमिपूजन १३ जुलै रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. १२ पूर्णांक २० शतांश किलोमीटर लांबीचा गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता हा मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा प्रकल्प आहे.

July 11, 2024 8:45 PM

views 28

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अर्थतज्ञांशी साधला संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत देशातल्या नामांकित अर्थतज्ञांशी संवाद साधला आणि आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबतची  त्यांची मतं आणि सूचना जाणून घेतल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन,  नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी आणि इतर सदस्य या बैठकीला  उपस्थित होते.  संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २२ तारखेपासून सुरु होणार असून २३ तारखेला केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.

July 10, 2024 1:51 PM

views 46

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ऑस्ट्रियाचे अध्यक्ष कार्ल नेहॅमर यांच्याशी व्हिएन्ना इथं भेट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ऑस्ट्रियातल्या व्हिएन्ना इथं ऑस्ट्रियाचे अध्यक्ष कार्ल नेहॅमर यांची भेट घेतली. आपल्या समाज माध्यमांवरच्या संदेशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेहॅमर यांनी स्वागत केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. भारत-ऑस्ट्रियाची मैत्री आगामी काळात आणखी मजबूत होईल, असंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. ऑस्ट्रियाचे अध्यक्ष कार्ल नेहॅमर यांनीही या भेटी बाबत आनंद व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ऑस्ट्रियामध्ये स्वागत करणं ही आनंदाची आणि सन्मानाची बाब असल्याचं नेहॅमर य...

July 8, 2024 12:59 PM

views 61

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसांच्या रशिया-ऑस्ट्रीया दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज तीन दिवसांच्या रशिया आणि ऑस्ट्रिया दौऱ्यावर रवाना झाले. आपल्या समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, हा दौरा या दोन्ही देशांबरोबच्या भारताची मैत्री अधिक मजबूत करण्याची एक मोठी संधी आहे. त्याआधी विमानतळावरुन प्रसिद्ध केलेल्या निवेदनात त्यांनी सांगितलं की, भारत आणि रशियामध्ये  गेल्या दहा वर्षात ऊर्जा, संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण, संस्कृती, पर्यटन आणि मनुष्यबळ क्षेत्रातली धोरणात्मक भागीदारी वाढली आहे. या दौऱ्यात प्रधानमंत्री रशियातल्या २२ व्...

July 5, 2024 2:52 PM

views 36

पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचं २८ खेळाडूंचं पथक जाहीर

पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचं २८ खेळाडूंचं पथक जाहीर झालं आहे. त्यात नीरज चोप्रा, अविनाश साबळे, कुशोर कुमार जेना, सर्वेश कुशारे, अक्षदीप सिंह या पुरुष खेळाडूंचा समावेश आहे. तर किरण पहल, पारुल चौधरी, ज्योती याराजी, प्रियांका गोस्वामी या महिला खेळाडूही या पथकात असतील. धावणे, भालाफेक, गोळाफेक, अडथळा शर्यत, तिहेरी उडी, उंच उडी, रिले आणि मिश्र मॅरेथॉन अशा विविध खेळांमध्ये ऑलिम्पिक पात्रता फेरी गाठली होती.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल या पथकातल्या खेळाडूंशी संवाद साधला. ऑलिम्पिक स्पर्धेतून फक्त ...

July 4, 2024 8:43 PM

views 40

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 22व्या भारत-रशिया वार्षिक परिषदेसाठी रशियाचा दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बाविसाव्या भारत रशिया वार्षिक परिषदेसाठी  ८ आणि ९ जुलै रोजी रशियाचा दौरा करणार आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी मोदी यांना आमंत्रण दिलं असून या परिषदेत दोन्ही देशांच्या प्रादेशिक तसंच जागतिक प्रश्नांविषयी चर्चा होईल, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे. त्यानंतर प्रधानमंत्री ९ आणि १० जुलै रोजी ऑस्ट्रियाचा दौरा करतील. ४१ वर्षांनंतर प्रथमच भारताच्या प्रधानमंत्र्यांचा ऑस्ट्रिया दौरा होत आहे. या दौऱ्यात मोदी ऑस्ट्रियाचे राष्ट्रपती अॅलेक्झांडर वॅन...

July 4, 2024 8:04 PM

views 34

कोणत्याही स्वरूपातल्या दहशतवादाचं समर्थन, किंवा माफी शक्य नाही – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

कोणत्याही स्वरूपातल्या दहशतवादाचं समर्थन केलं जाऊ शकत नाही,  किंवा त्याला माफी दिली जाऊ शकत नाही, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या कझाकस्तानमधे अस्ताना इथं होत असलेल्या शिखर परिषदेत सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी प्रधानमंत्र्यांचं भाषण वाचून दाखवलं.    दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या किंवा त्यांना माफी देणाऱ्या देशांना आंतरराष्ट्रीय समुदायानं एकटं पाडण्याची गरज मोदी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. युवा पिढीमध्ये कट्टरतावाद पसरणार नाही, य...